‘झी मराठी’ वाहिनीवरील गाजलेल्या मालिकांपैकी एक मालिका म्हणजे ‘देवमाणूस’. या मालिकेला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. त्यामुळे या मालिकेचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. ‘देवमाणूस २’ या मालिकेलाही प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालं. या मालिकेत डॉ. अजितकुमार चंद्रकांत देव म्हणजे देवीसिंगची भूमिका अभिनेता किरण गायकवाडने उत्कृष्टरित्या साकारली होती. एका खेडे गावातल्या लोकांच्या जीवाला धोका निर्माण करणाऱ्या डॉ. देवीसिंगची कथेने प्रेक्षकांना चांगलं खिळवून ठेवलं होतं. याच मालिकेतील किरण गायकवाड आता लवकरच बोहल्यावर चढणार आहे. अभिनेत्याने नुकतीच लग्नाची तारीख जाहीर केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘लागिरं झालं जी’ मालिकेतून घराघरात पोहोचलेला भैय्यासाहेब आणि ‘देवमाणूस’ मालिकेमुळे प्रसिद्धीझोतात आलेला देवीसिंग अर्थात किरण गायकवाडने काही दिवसांपूर्वी प्रेमाची कबुली दिली होती. २९ नोव्हेंबरला अभिनेत्री वैष्णवी कल्याणकरबरोबर फोटो शेअर करत, “ही आहे माझी होणारी ‘होम मिनिस्टर’” असं जाहीर केलं होतं. किरण गायकवाडच्या या पोस्टमुळे चाहत्यांना सुखद धक्का बसला होता. त्यानंतर अलीकडेच किरणने होणारी पत्नी वैष्णवीबरोबर पहिला रील व्हिडीओ शेअर केला; जो क्षणार्धात व्हायरल झाला. आता किरणने लग्नाच्या तारखेचा खुलासा केला आहे.

हेही वाचा – Bigg Boss 18: फराह खान तजिंदर बग्गा-ईशा सिंहवर भडकली, सिद्धार्थ शुक्लाचा केला उल्लेख; नेमकं काय घडलं? जाणून घ्या

अवघ्या काही दिवसांनंतर किरण वैष्णवीशी लग्नगाठ बांधून आयुष्याच्या नव्या वाटेवर पाऊल ठेवणार आहे. वैष्णवीबरोबर मजेशीर व्हिडीओ शेअर करत किरणने लग्नाची तारीख सांगितली आहे. १४ डिसेंबरला दोघं लग्नबंधनात अडकणार आहेत. “१४ डिसेंबर ही तारीख नोंद करून ठेवा”, असं अभिनेत्याने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे.

हेही वाचा – Bigg Boss 18: “…तर तू थेट शो बाहेर होशील”, फराह खानने रजत दलालला चांगलंच झापलं अन् दिली शेवटची ताकीद, म्हणाली, “तू स्वतःला…”

हेही वाचा – Video: ‘स्टार प्रवाह’च्या ‘तू ही रे माझा मितवा’ नव्या मालिकेचा नवा दमदार प्रोमो प्रदर्शित, नेटकरी म्हणाले, “कडक…”

दरम्यान, किरण गायकवाड आणि वैष्णवी कल्याणकर यांची पहिली भेट ‘देवमाणूस या मालिकेच्या सेटवर झाली आणि इथे दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले. दोघांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, किरण सध्या वेगवेगळ्या चित्रपटांमध्ये विविधांगी भूमिकेत पाहायला मिळत आहे. तर वैष्णवी ‘सन मराठी’ वाहिनीवरील ‘तिकळी’ नावाच्या मालिकेत दिसत आहे. या मालिकेत तिने नली ही प्रमुख भूमिका साकारली आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Devmanus fame kiran gaikwad will get marry with vaishnavi kalyankar on 14 december pps