Zee Marathi Devmanus : छोट्या पडद्यावरच्या मालिकांची लोकप्रियता ही टीआरपीवरून ठरवली जाते. त्यामुळे TRPच्या शर्यतीत अग्रेसर राहण्यासाठी प्रत्येक मराठी टेलिव्हिजन वाहिनीकडून सध्या नवनवीन प्रयत्न करण्यात येत आहे. आता येत्या काही दिवसांत ‘झी मराठी’वर नवनवीन मालिका सुरू होणार आहेत. यापैकी, ‘देवमाणूस’ मालिकेच्या प्रक्षेपणाची तारीख अन् वेळ नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. या मालिकेची प्रेक्षक गेल्या कित्येक दिवसांपासून आतुरतेने वाट पाहत होते.

येत्या २ जूनपासून रात्री १० वाजता ‘देवमाणूस’ आपल्या सर्वांच्या भेटीला पुन्हा एकदा येणार आहे. यापूर्वी ‘देवमाणूस’ मालिकेचे दोन भाग प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. या सिरियलमध्ये मुख्य भूमिका अभिनेता किरण गायकवाड साकारत आहे. आता यंदाच्या सीझनमध्ये किरणच्या साथीला एका दमदार अभिनेत्याची एन्ट्री होणार आहे.

किरण गायकवाडच्या सोबतीला ‘देवमाणूस’ मालिकेत ज्येष्ठ अभिनेते माधव अभ्यंकर झळकणार आहेत. यापूर्वी त्यांनी ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेत सर्वत्र गाजलेलं अण्णा नाईक हे पात्र साकारलं होतं. आता ‘देवमाणूस’च्या निमित्ताने अण्णा नाईक पुन्हा एकदा छोटा पडदा गाजवण्यासाठी सज्ज झाले आहेत.

किरण गायकवाड आणि माधव अभ्यंकर यांच्यासह या मालिकेत अभिनेत्री सोनम म्हसवेकर आणि सरु आजीची भूमिका साकारणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री रुक्मिणी सुतार देखील झळकणार आहेत. अण्णा नाईक आणि देवमाणूस हे दोघेही प्रेक्षकांचे आवडते खलनायक असल्याने सध्या ‘देवमाणूस’च्या प्रोमोवर सर्व स्तरांतून कौतुकाचा वर्षाव करण्यात आहे.

“देवमाणूस आणि अण्णा नाईक एकत्र”, “रात्रीस देवमाणसाचे खेळ चाले”, “अण्णा नाईक आणि देवमाणूस एकत्र म्हणजेच आता खरी मजा येणार”, “सरू आजी- अण्णा नाईक- देवमाणूस… बापरे मल्टिव्हर्स आहे हे”, “वॉव कडक प्रोमो आहे हा…”, “याला म्हणतात प्रोमो दोन खलनायक पुन्हा गाजवणार”, “दोन दमदार कलाकार एकत्र… कडक!” अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी या मालिकेच्या प्रोमोवर दिल्या आहेत.

View this post on Instagram

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ‘देवमाणूस’ ही नवीन मालिका येत्या २ जूनपासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिरियलची वेळ रात्रीची १० वाजताची असल्याने लवकरच ‘चल भावा सिटीत’ हा शो प्रेक्षकांचा निरोप घेण्याची शक्यता आहे.