Devmanus upcoming twist: मालिकेत जेव्हा ट्विस्ट येतात, तेव्हा पुढे नेमकं काय घडणार अशी प्रेक्षकांना उत्सुकता लागलेली असते. गोष्ट कशी पुढे जाणार,हे जाणून घेण्यास प्रेक्षक उत्सुक असतात.
आता देवमाणूस या मालिकेत लालीने नुकताच आर्याचा खून केला. तिचा मृतदेह तिथेच सोडून तिथून ती निघून गेली. मात्र, गोपाळ तिथेच होता. आर्याच्या खूनचा आरोप त्याच्यावर येऊ नये, म्हणून तो तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी विविध गोष्टी करत असल्याचे पाहायला मिळत आहे.
‘त्या’ पुराव्यामुळे गोपाळ आर्याच्या खून प्रकरणात अडकणार का?
आता झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर देवमाणूस मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की गोपाळ लपतछपत आर्याच्या घरी येतो. तो म्हणतो, “आर्याच्या प्रेग्नंन्सीचे रिपोर्ट हाती लागले पाहिजेत. कारण-ते जर जामकरच्या हाती लागले तर माझी वाट लागेल.” तो आर्याच्या घरात विविध ठिकाणी शोधाशोध करतो.
त्यानंतर तो घरातील फ्रीज उघडून बघतो. तर त्यामध्ये आर्याचा मृतदेह दिसतो. तो मृतदेह पाहून त्याला धक्का बसतो. तो स्वत:शीच म्हणतो, “ही डेडबॉडी इथे कोणी ठेवली? आधी या डेडबॉडीची विल्हेवाट लावायला पाहिजे.” त्यानंतर तो फ्रीजमधून आर्याचा मृतदेह बाहेर काढतो. तितक्यात त्याला इन्स्पेक्टर मार्तंड जामकर त्याच्या घरी येत असल्याचे समजते. पोलिसांच्या गा़डीचा आवाज त्याला येतो.
प्रोमोमध्ये पुढे पाहायला मिळते की मार्तंड जामकर त्याच्या घरी येतो. तो त्याच्या बहिणीला हाक मारतो. तो म्हणतो, “चिमणे…बाहेर ये. किती शोधलं तुला.” त्यानंतर तो रडत असल्याचे दिसत आहे. गोपाळ हा आर्याचा मृतदेह घेऊन घरातील वरच्या बाजूला बसला आहे. आर्याचा मृतदेह फ्रीजमध्ये ठेवल्याने तिच्या शरीरावर बर्फ जमा झाला होता. मृतदेह बाहेर काढल्यानंतर त्याचे पाणी होत असून त्याचे थेंब खाली पडत असल्याचे पाहायला मिळाले.
आता त्यावरून इन्स्पेक्टर जामकरला आर्याच्या मृत्यूबद्दल समजणार का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. तसेच, आर्या प्रेग्नंट होती हे जामकरला समजणार का, त्यावरून गोपाळ तिच्या खून प्रकरणात अडकणार का, हेही पाहणे महत्वाचे ठरणार आहे. आता हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने, “जामकर बहिणीपर्यंत पोहोचू शकेल का?”, अशी कॅप्शन दिली आहे.
आता मालिकेत नेमकं काय घडणार, आर्याच्या मृत्यूबद्दल जामकरला कधी समजणार, तसेच लाली खून असल्याचे सत्य सर्वांसमोर कधी येणार, जेव्हा गोपाळ आणि लाली एकमेकांसमोर येणार तेव्हा काय घडणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
