Devoleena Bhattacharjee announces pregnancy : ‘साथ निभाना साथिया’ फेम लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जी आई होणार आहे. बऱ्याच दिवसांपासून देवोलीना गरोदर असल्याच्या चर्चा सुरू होत्या, अखेर तिने स्वतःच फोटो पोस्ट करून आनंदाची बातमी चाहत्यांना दिली आहे.

देवोलीनाचा ‘पंचामृत’ विधी पार पडला. या विधीचे काही फोटो शेअर करत तिच्या आई होणार असल्याची आनंदाची बातमी दिली. फोटोत दिसतंय की तिने या विधीसाठी देवोलीनाने हिरव्या रंगाची सुंदर साडी नेसली आहे, तसेच लाल बांगड्या घातल्या. तिने सोन्याचे दागिने घालून तिचा लूक पूर्ण केला. तिने एका फोटोत लहान बाळाचा ड्रेस पकडला आहे, ज्यावर ‘आता तुम्ही विचारणं बंद करू शकता’ असं लिहिलं आहे.

देवोलीना व तिचा पती शानवाज शेख यांनी सोफ्यावर बसून आपल्या पाळीव श्वानाबरोबर फोटो काढले. देवोलीनाने शेअर केलेल्या या फोटोंमध्ये तिची आई, तिची सासू व इतर काही जण दिसत आहेत. “पवित्र पंचामृत विधीसह मातृत्वाचा हा प्रवास साजरा करतोय,” असं कॅप्शन तिने या फोटोंना दिलं आहे.

Stree 2: श्रद्धा कपूरच्या ‘स्त्री २’ची ग्रँड ओपनिंग! ‘फायटर’, ‘कल्की’ला टाकलं मागे; पहिल्याच दिवशी कमावले तब्बल…

देवोलीनाच्या या पोस्टवर आरती सिंग, रुची हसबनीस, नझीम खिलजी, तान्या शर्मा, राजीव अडातिया, जय भानुशाली, सुप्रिया शुक्ला, दलजीत कौर या कलाकारांनी कमेंट्स केल्या आहेत. त्यांनी देवोलीना व शाहनवाजला या नवीन प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांनी केलं होतं अरेंज मॅरेज, कोण आहेत त्यांचे पती? जाणून घ्या

देवोलीना-शानवाजचे लग्न

देवोलीना भट्टाचार्जीने जिम ट्रेनर शानवाज शेखला काही वर्षे डेट केलं होतं, त्यानंतर हे दोघेही १४ डिसेंबर २०२२ रोजी लग्नबंधनात अडकले. दोघांनी नोंदणी पद्धतीने लग्न केलं होतं. अगदी साधेपणाने त्यांचं लग्न पार पडलं होतं. या लग्नात दोघांचे कुटुंबीय व काही जवळचे लोक उपस्थित होते. आता लग्नानंतर दीड वर्षांनी देवोलीना व शानवाज आई-बाबा होणार आहेत.

देवोलीना भट्टाचार्जीने शेअर केले फोटो

“५ महिन्यांपूर्वी बाबा होतास, आता कोण झालास!” विकी कौशलला सॅम मानेकशॉ यांच्या मुलीने केला मेसेज; अभिनेता म्हणाला…

देवोलीनाचे करिअर

देवोलीनाने २०११ मध्ये ‘सवांरे सबके सपने प्रीतो’ या शोमधून अभिनयाला सुरुवात केली होती. नंतर ती ‘साथ निभाना साथिया’ मध्ये गोपीच्या भूमिकेत दिसली होती, या मालिकेतून तिला खूप लोकप्रियता मिळाली. देवोलीना ‘बिग बॉस’मध्येही सहभागी झाली होती. देवोलीना ही एक प्रशिक्षित भरतनाट्यम नृत्यांगना आहे आणि तिने २०१० मध्ये ‘डान्स इंडिया डान्स २’ या डान्स रिॲलिटी शोमध्ये भाग घेतला होता. देवोलीनाने ‘लाल इश्क’, ‘साथ निभाना साथिया २’ आणि ‘दिल दियां गल्लां’ सारख्या शोमध्ये काम केलं आहे. सध्या ती ‘छठी मैय्या की बिटिया’ या शोमध्ये महत्वाची भूमिका साकारत आहे. हा शो सन निओवर प्रसारित होतो.