Dhurandhar 2 Box Office Collection: सिनेमे जेव्हा थिएटरमध्ये प्रदर्शित होतात त्यावेळी ते किती कमाई करतात यावरून ते यशस्वी ठरतात की अपयशी ठरतात हे समजते, त्यामुळे एखादा सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर दररोज तो सिनेमा किती कमाई करतो याकडे सर्वांचे लक्ष असते.

अनेक नवनवीन सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. त्यापैकी काहीच चित्रपट बॉक्स ऑफिसवर गाजतात; त्यापैकी एक ‘धुरंधर २’ हा सिनेमा आहे. हा सिनेमा प्रदर्शित होण्याआधीपासूनच मोठ्या चर्चेत होता. तसेच पेड प्रीव्ह्यूमधून या सिनेमाने चांगली कमाई केली होती. १९ मार्चला प्रदर्शित झालेल्या सिनेमाच्या कमाईत दरदिवशी फरक दिसत असला तरीही हा सिनेमा बॉक्स ऑफिसवरील अनेक रेकॉर्ड मोडत आहे.

‘धुरंधर २’ च्या कमाईत १२ व्या दिवशी मोठी घसरण

आता १२ व्या दिवशी या सिनेमाने एकूण किती कमाई केली आहे हे जाणून घेऊ…

Award Banner

‘धुरंधर २’ने प्रदर्शित झाल्याच्या दुसऱ्या रविवारी भारतात २५.३० कोटींची कमाई केली आहे. ही आतापर्यंतची सर्वात कमी कमाई आहे. यांसह चित्रपटाने भारतात एकूण ८७२.१७ कोटींची कमाई केली आहे, तर जगभरात १३९२.१३ कोटींची कमाई केली आहे. फक्त १२ दिवसांत १,००० कोटींचा टप्पा पार करणे, हा एक मैलाचा दगड असल्याचे म्हटले जात आहे.

आता आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर २’ने लोकप्रिय अभिनेता यशची प्रमुख भूमिका असलेल्या ‘केजीएफ चाप्टर २’ला मागे टाकले आहे. या सिनेमाने जगभरात १२१५ कोटींची कमाई केली आहे. यशचा ‘टॉक्झिक’ हा सिनेमादेखील ‘धुरंधर २’ प्रमाणे १९ मार्चला प्रदर्शित होणार होता, मात्र निर्मात्यांनी चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलली.

‘धुरंधर २’मध्ये रणवीर सिंह प्रमुख भूमिकेत आहे. त्याच्याबरोबर या सिनेमात राकेश बेदी, सारा अर्जुन, अर्जुन रामपाल, संजय दत्त, आर. माधवन हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसले आहेत. प्रत्येकाच्या कामाची, भूमिकेची चर्चा होताना दिसत आहे.

प्रेक्षकांसह कलाकारांनीदेखील ‘धुरंधर २’बद्दल मत व्यक्त केले. अनेकांनी कौतुक केले, तर अनेकांनी टीका केली. काही कलाकारांनी हा सिनेमा म्हणजे प्रोपगंडा असल्याचे म्हटले.

दरम्यान, आगामी काळात ‘धुरंधर २’ आणखी किती कमाई करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.