हिंदी मालिकाविश्वातील लाडक्या जोडीपैकी एक म्हणजे दीपिका कक्कर व शोएब इब्राहिम यांची जोडी. तीन महिन्यांपूर्वी दोघं आई-बाब झाले. २१ जूनला दीपिकाने एका गोंडस मुलाला जन्म दिला. मग काही दिवसांनी दोघांनी मुलाच्या नावाचा खुलासा केला. ‘रुहान’ असं त्यांच्या मुलाचं नाव आहे. पण मुलाचं नाव मुस्लिम ठेवल्यामुळे दोघं चांगलेच ट्रोल झाले होते. याकडे दुर्लक्ष करून आता दीपिका व शोएबने ‘रुहान’चा पहिला फोटो चाहत्यांसाठी सोशल मीडियावर शेअर केला आहे. शिवाय शोएबनं त्याच्या युट्यूब चॅनेलवर मुलांबरोबरचा मज्जा-मस्ती करताना व्लॉग देखील शेअर केला आहे.

हेही वाचा – Video: परिणीती चोप्रा-राघव चड्ढा कुटुंबियांसह पोहोचले उदयपूरला, विमानतळावर झालं खास स्वागत

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
CM Devendra Fadnavis on LOP
CM Devendra Fadnavis on LOP: विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद…

सोशल मीडियावर शोएबने मुलाचा फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहीलं आहे की, “तुमच्या सर्वांची ओळख करून देतो, हा रुहान. तुमचे आशीर्वाद असू द्या. युट्यूब चॅनेलवर व्लॉग पोस्ट करण्यात आला आहे.”

हेही वाचा – “देवाने सांगितलं नाहीये की…”, गणेशोत्सवातील खटकणाऱ्या गोष्टींबद्दल स्पष्टच बोलला शशांक केतकर

हेही वाचा – ‘जवान’नंतर दाक्षिणात्य अभिनेत्री नयनतारा बॉलीवूडमध्ये करणार नाही काम; दिग्दर्शक अ‍ॅटलीवर आहे नाराज

शोएबच्या या पोस्टवर कलाकार मंडळींसह चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. अभिनेत्री गौहर खान, अविका गौर, भारती सिंह, मेघा धाडे आणि शीरिन मिर्झा अशा अनेक कलाकारांनी शोएबच्या पोस्टवर प्रतिक्रिया दिली आहे. तसेच तो व्लॉगमध्ये रुहानबरोबर मज्जा मस्ती करताना पाहायला मिळत आहे.

हेही वाचा – ‘रंग माझा वेगळा’ मालिकेतील आणखी एका अभिनेत्रीनं दिली आनंदाची बातमी; म्हणाली, “तुमचा विश्वास…”

हेही वाचा – Rahul Vaidya And Disha Parmar: मुलीचं नाव काय ठेवणार? राहुल वैद्य म्हणाला, “राशीनुसार…”

दरम्यान, दीपिकाची डिलिव्हरी प्री-मॅच्युअर झाल्यामुळे व बाळ अशक्त असल्यामुळे त्याला एनआयसीयूमध्ये ठेवण्यात आलं होतं. तब्बल १९ दिवस बाळ एनआयसीयूमध्ये राहिल्यानंतर दीपिकाला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. २०१८ मध्ये दीपिकाने शोएबबरोबर लग्न केलं. लग्नानंतर तिनं इस्लाम धर्म स्वीकारला आणि स्वतःचं नाव बदलून फैजा ठेवलं. यापूर्वी दीपिकाचे २०११ मध्ये रौनक सैमसनबरोबर लग्न झाले होते. परंतु २०१५ मध्ये दोघं विभक्त झाले.

Story img Loader