टीव्ही अभिनेत्री दीपिका कक्कर व अभिनेता शोएब इब्राहिम हे दाम्पत्य लवकरच आई-बाबा होणार आहेत. दीपिका गर्भवती असून ते आपल्या बाळाची आतुरतेने वाट पाहत आहेत. दीपिका तिच्या व्लॉगच्या माध्यमातून चाहत्यांना माहिती शेअर करत असते. बऱ्याचदा तिच्यावर मुस्लीम असलेल्या शोएबशी लग्न केल्यानेही टीका होते. पण, याच दीपिकाला लहानपणी खूप त्रास सहन करावा लागला होता.
हेही वाचा – शारीरिक संबंधांना खेळ म्हणून मान्यता, ‘या’ देशात होणार पहिली सेक्स चॅम्पियनशिप
‘ई-टाइम्स’शी बोलताना दीपिकाने लहानपणीचे अनुभव कथन केले होते. “तुम्ही ताटातूट झालेल्या घरात वाढता तेव्हा बऱ्याच गोष्टी सहन कराव्या लागतात. माझ्या पालकांनी त्यांच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या नाहीत असं मी म्हणत नाही. त्यांनी माझं चांगलं व्हावं, यासाठी खूप काही केलंय, मला त्याबद्दल त्यांचा आदर वाटतो. जेव्हा मला गरज होती, तेव्हा माझे पालक माझ्याबरोबर होते, माझं त्यांच्याशी चांगलं नातं आहे आणि मी त्यांच्या संपर्कात आहे,” असं दीपिका म्हणाली होती.
हेही वाचा – “मी मायलेकीला सोडलं नाही”; गौतमी पाटीलच्या वडिलांचा दावा; म्हणाले, “मी पुण्यात असताना…”
“तुम्ही ताटातूट झालेल्या घरात मोठे होता, तेव्हा आयुष्य कठीण असतं. प्रत्येक मूल वेगवेगळ्या गोष्टींवर वेगळ्या पद्धतीने प्रतिक्रिया देतं. काही मुलं डिप्रेशनमध्ये जातात, काही आक्रमक होतात तर काही स्वतःत गुंग असतात. मी माझ्या लहानपणी खूप शांत होते, लोकांशी मैत्री करू शकत नव्हते. माझे मोजकेच मित्र आहेत. मी लोकांना माझ्या फार जवळ येऊ देत नाही. मला नेहमीच आनंदी कुटुंब हवं होतं. मला माझ्या घरात भावना, आनंद, नातेसंबंध हवे होते. शोएबशी लग्न केल्यानंतर या सर्व गोष्टी मिळाल्या,” असं दीपिकाने सांगितलं.