‘बिग बॉस’, ‘बिग बॉस मराठी’, ‘मास्टरशेफ इंडिया’, ‘लाफ्टर शेफ’, ‘खतरों के खिलाडी’, ‘स्पिल्ट्सव्हिला’, ‘रोडीज’, असे विविध रिअॅलिटी शो पाहायला मिळतात. या रिअॅलिटी शोंमधून सहभागी झालेल्या स्पर्धकांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अधिक जाणून घेता येते.

काही रिअॅलिटी शोमध्ये टास्क दिले जातात. ते टास्क जर ठरवून दिलेल्या नियमांनुसार पूर्ण केले तर तो स्पर्धक पुढे जातो. तर बिग बॉससारख्या शोमध्ये काही स्पर्धक काही ठरावीक कालावधीसाठी एकत्र राहतात. प्रेक्षकांना जे स्पर्धक आवडतील, त्या स्पर्धकांना प्रेक्षक व्होट करतात. ज्या स्पर्धकाला सर्वांत कमी व्होट मिळतात, त्या स्पर्धकाला घराबाहेरचा रस्ता धरावा लागतो.

आता या रिअॅलिटी शोमध्ये आणखी एका शोची भर पडली आहे. ‘द ५०’ असे या शोचे नाव आहे. या शोमध्ये ५० स्पर्धक सहभागी झाले होते. त्यातील काही स्पर्धक या शोमधून बाहेर पडले आहेत. दिव्या अग्रवालदेखील या शोमध्ये सहभागी झाली आहे. आता एका भांडणात तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल एका स्पर्धकाने वक्तव्य केले आहे.

दिव्याचे अर्चना गौतम आणि भव्या सिंग यांच्याबरोबर भांडण झाले. या भांडणात भव्या सिंगने दिव्याला गोल्ड डिगर आहे. इतकेच नाही, तर दिव्या तिच्या नवऱ्याबरोबर राहत नाही, असेही सांगितले.

“लोक तिला गोल्ड डिगर…”

शोमध्ये बैल अँड बुद्धी हा टास्क देण्यात आला होता. या टास्कमध्ये दिव्या आणि अर्चनाचे भांडण झाले. अर्चनाला डोकं नाही, असे दिव्या म्हणाली. अर्चनाबरोबर चांगले बॉण्डिंग असलेल्या भव्याला दिव्याचे वागणे आवडले नाही. दिव्या वॉशरूममध्ये रडत होती. त्यावेळी भव्याने तिला टिश्यू देण्यास नकार दिला. त्यानंतर सपना चौधरी आणि आर्याबरोबर बोलताना भव्याने दिव्याच्या वैयक्तिक आयुष्यावर वक्तव्य केले. ती म्हणाली की, ती फेक आहे. लोक तिला गोल्ड डिगर म्हणतात, यामध्ये काही आश्चर्य नाही.

पुढे ती असेही म्हणाली, “दिवाळीला खरे फटाके तर हिच्या घरी फुटले होते, जे मीच फोडले होते. ती तिच्या पतीपासून वेगळी राहते. मुंबईत लोकांकडे भीक मागते की माझ्या घरी राहायला या. मला भेटा. ती तिच्या नवऱ्याबरोबर राहत नाही.

दिव्याने फेब्रुवारी २०२४ मध्ये उद्योगपती अपूर्व पाडगांवकर यांच्याबरोबर लग्नगाठ बांधली होती. मुंबईत पारंपरिक मराठी पद्धतीने हा विवाहसोहळा पार पडला होता. त्याच वर्षी मे महिन्यात दोघांच्या विभक्त होण्याबाबतच्या चर्चांना ऊत आला होता. मात्र, दिव्याने त्या चर्चा अफवा असल्याचे सांगून फेटाळून लावल्या होत्या.

तिने लिहिले होते की, मी कोणताही गोंधळ घातला नाही. मी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मी २,५०० पोस्ट्स डिलीट केल्या. लोक माझ्याकडून काय अपेक्षा करतात हेपाहणे खरेच मजेशीर आहे. मी नेहमीच लोकांच्या अपेक्षेपेक्षा वेगळं काहीतरी केलं आहे आणि आता लोक ज्या गोष्टींची अपेक्षा करत आहेत, बाळ किंवा घटस्फोट यापैकी काहीही होणार नाही. तसेच, ती आणि अपूर्व पाडगांवकर एकत्र असल्याचेदेखील तिने लिहिले होते.

दरम्यान, भव्याच्या या वक्तव्यावर अपूर्व पाडगांवकर यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.