अभिनेत्री दिव्या अगरवालच्या घटस्फोटाच्या चर्चांना सध्या उधाण आलं आहे. तिने इन्स्टाग्रामवरून लग्नाचे व पतीबरोबरचे सगळे फोटो डिलीट केल्याने अवघ्या तीन महिन्यात दिव्या घटस्फोट घेणार का, अशा चर्चा सुरू झाल्या. फक्त दिव्यानेच नाही तर तिचा पती अपूर्व पाडगांवकर यानेही त्याच्या अकाउंटवरून दिव्याबरोबरचे सर्व फोटो हटवले आहेत. तिच्या घटस्फोटाच्या चर्चांवर तिनेच पोस्ट शेअर करून मौन सोडलं आहे.

दिव्या अग्रवालने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये लिहिलं, “मी काहीच बोलले नाही. मी कोणतीही कमेंट किंवा पोस्ट केलेली नाही. मी २५०० पोस्ट हटवल्या. पण मीडियाने फक्त लग्नाचे फोटो न दिसण्यावरच प्रतिक्रिया दिली. लोक याकडे कसे पाहतात आणि माझ्याकडून त्यांना काय अपेक्षित आहे, हे पाहणं रंजक आहे. मी नेहमी तेच केलं जे लोकांना माझ्याकडून अपेक्षित नव्हतं. आणि त्यांच्या काय अपेक्षा आहेत – घटस्फोट किंवा बाळ? खरं तर यापैकी काहीही नाही.”

प्रसिद्ध अभिनेत्रीने हटवले लग्न अन् गुढीपाडव्याचे फोटो, तीन महिन्यांतच घेणार मराठमोळ्या पतीपासून घटस्फोट?

दिव्याने पुढे लिहिलं, “खरं तर आता फक्त मला माझ्या प्रोफाइलवर पिन केलेल्या पहिल्या पोस्टबद्दल बोलायचं आहे. प्रत्येक कथेचा शेवट आनंदी असतो आणि देवाच्या कृपेने माझे पती माझ्या शेजारी शांतपणे झोपले आहेत आणि घोरत आहेत.” अशी स्टोरी इन्स्टाग्रामवर पोस्ट करत दिव्याने घटस्फोटाच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. इन्स्टाग्रामवरील २५०० पोस्ट हटवल्या आणि त्यापैकी काही फोटो लग्नाचे व पती अपूर्वबरोबरचे होते, असं तिने म्हटलं आहे.

“मी आई झाले नाही कारण…”, मूल न होऊ देण्याबद्दल अरुणा इराणींनी सोडलं मौन; म्हणाल्या, “विवाहित पुरुषाशी…”

दिव्या अगरवालची पोस्ट

दिव्या अग्रवाल आणि तिचा बॉयफ्रेंड अपूर्व पाडगावकर यांनी २० फेब्रुवारी २०२४ रोजी अभिनेत्रीच्या चेंबूर येथील घरी लग्नगाठ बांधली होती. दिव्या व अपूर्व यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर लग्नाचे अनेक फोटो शेअर केले होते. दोघांनी एंगेजमेंट केल्यापासून एकमेकांबरोबरचे अनेक फोटो आपापल्या अकाउंटवर पोस्ट केले होते, मात्र ते सर्व फोटो त्यांनी डिलीट केले आहेत. दोघांचा एकमेकांबरोरचा एकही फोटो इन्स्टाग्रामवर न दिसल्याने त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आलं. लग्नानंतर अवघ्या तीन महिन्यातच या दोघांच्या नात्यात बिनसल्याच्या चर्चा होऊ लागल्या, पण तसं काहीच नसल्याचं स्पष्टीकरण दिव्या अगरवालने दिलं आहे.

स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारुकीने केलं दुसरं लग्न, हिना खानने लावली हजेरी, ‘तो’ फोटो व्हायरल

दरम्यान, दिव्या व अपूर्व काही दिवसांपूर्वीच जोडीने एका कार्यक्रमाला गेले होते, त्याठिकाणचे दोघांचे फोटो व व्हिडीओ खूप चर्चेत होते. त्यानंतर अचानक त्यांनी फोटो हटवल्याने चाहत्यांना धक्का बसला होता. मात्र आता घटस्फोटासारखं काहीही घडत नसल्याचं दिव्याने सांगितलं आहे.