दिव्या अग्रवालच्या साखरपुड्यानंतर एक्स बॉयफ्रेंडची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला... | divya agrawal ex boyfriend varun sood reacts on her engagement tweet goes viral | Loksatta

दिव्या अग्रवालच्या साखरपुड्यानंतर एक्स बॉयफ्रेंडची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला…

दिव्या अग्रवालने मार्च २०२२ मध्ये वरुण सूदशी ब्रेकअप केलं होतं. आमचं एकत्र काहीच भविष्य नाही त्यामुळे आम्ही वेगळे होत आहोत असं तिने त्यावेळी म्हटलं होतं

दिव्या अग्रवालच्या साखरपुड्यानंतर एक्स बॉयफ्रेंडची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला…
(फोटो सौजन्य- दिव्या अग्रवाल, वरुण सूद इन्स्टाग्राम)

‘बिग बॉस ओटीटी’ विजेती दिव्या अग्रवाल सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. तिने काही दिवसांपूर्वीच चेंबुरमध्ये आलिशान घर विकत घेतलं आहे. त्यानंतर आता वाढदिवशी तिने बॉयफ्रेंड अपूर्व पाडगांवकरशी साखरपुडा उरकला. दिव्या अग्रवालने याबाबत सोशल मीडियावरून माहिती दिली. ज्यामुळे तिचे चाहतेही हैराण झाले आहेत. कारण तिने मार्च २०२२ मध्ये वरुण सूदशी ब्रेकअप केलं होतं. आमचं एकत्र काहीच भविष्य नाही त्यामुळे आम्ही वेगळे होत आहोत असं तिने त्यावेळी म्हटलं होतं. त्यामुळे यावर वरुण काय प्रतिक्रिया देतो याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं.

दिव्या अग्रवाल अशाप्रकारे अचानक साखरपुडा करेल याची कोणालाच कल्पना नव्हती. एवढंच नाही तर तिने बिझनेसमन अपूर्व पाडगांवकरला डेट करत आहे याचीही कधी हिंट दिली नव्हती. त्यामुळे दिव्याच्या साखरपुड्यानंतर सर्वांनाच धक्का बसला होता. दिव्या आणि अपूर्व यांचा एका व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यात अपूर्व फिल्मी स्टाइलमध्ये गुडघ्यावर बसून दिव्याला प्रपोज करताना दिसत आहे आणि दिव्याही आनंदाने त्याला होकार देताना दिसतेय. अशातच एक्स बॉयफ्रेंड वरुण सूदने केलेलं ट्वीट चर्चेत आहे.

आणखी वाचा- वरुण सूदबरोबर ब्रेकअपनंतर दिव्या अग्रवालने मराठमोळ्या बिझनेसमनशी केला साखरपुडा; पोस्ट चर्चेत

वरुण सूदने दिव्या अग्रावालच्या पोस्टनंतर एक ट्वीट केलं आहे. त्याच्या या ट्वीटचा थेट संबंध दिव्याशी जोडला जात आहे. वरुण सूदने त्याच्या ट्वीटमध्ये नजर झुकवलेला एक इमोजी पोस्ट केला आहे. वरुणच्या या ट्वीटवर अनेक युजर्सनी कमेंट्स केल्या आहे. एका युजरने कमेंट करताना लिहिलं, “वाचलास तू” तर दुसऱ्या एकाने लिहिलं, “वरुण तुझ्या भावना मी समजू शकतो कारण मी देखील या परिस्थितीतून जात आहे.” याशिवाय आणखी एकाने लिहिलं, “वरुण तुला यापेक्षा चांगली व्यक्ती मिळेल.”

दरम्यान दिव्या अग्रवाल सुरुवातीला अभिनेता प्रियांक शर्माला डेट करत होती. पण जेव्हा प्रियांक बिग बॉस ११ मध्ये सहभागी झाला तेव्हा त्यांची हिना खानशी चांगली मैत्री झाली. त्यावेळी दिव्याने प्रियांकशी असलेले सर्व संबंध तोडून टाकले होते. त्यानंतर दिव्याने वरुण सूदला डेट करायला सुरुवात केली. चार वर्षांच्या रिलेशनशिपनंतर दोघंही लग्न करतील अशी चर्चा असतानाच दोघांचं ब्रेकअप झाल्याचं समोर आलं.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन ( Television ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-12-2022 at 18:31 IST
Next Story
“आता सर्व प्रश्न…” ‘तारक मेहता’ फेम राज अनाडकतने मालिका सोडल्याच्या चर्चांवर सोडलं मौन