divya agrawal got engaged with boyfriend apoorva padgaonkar photos viral | वरुण सूदबरोबर ब्रेकअपनंतर दिव्या अग्रवालने मराठमोळ्या बिझनेसमनशी केला साखरपुडा; पोस्ट चर्चेत | Loksatta

वरुण सूदबरोबर ब्रेकअपनंतर दिव्या अग्रवालने मराठमोळ्या बिझनेसमनशी केला साखरपुडा; पोस्ट चर्चेत

अभिनेता वरुण सूदशी ब्रेकअपनंतर चर्चेत आलेल्या दिव्या अग्रवालने तिच्या वाढदिवशी मराठमोठ्या बिझनेसमन बॉयफ्रेंडशी साखरपुडाही केला आहे

वरुण सूदबरोबर ब्रेकअपनंतर दिव्या अग्रवालने मराठमोळ्या बिझनेसमनशी केला साखरपुडा; पोस्ट चर्चेत
(फोटो सौजन्य- दिव्या अग्रवाल इन्स्टाग्राम)

बिग बॉस ओटीटी विजेती दिव्या अग्रवालने ५ डिसेंबरला तिचे कुटुंबिय आणि जवळचा मित्रपरिवार यांच्याबरोबर ३० वा वाढदिवस साजरा केला. दिव्याने वाढदिवसानिमित्त जंगी पार्टीचं आयोजन केलं होतं. ज्यात बरेच टीव्ही कलाकार सहभागी झाले होते. अभिनेता वरुण सूदशी ब्रेकअपनंतर चर्चेत आलेल्या दिव्या अग्रवालने तिच्या वाढदिवशी मराठमोठ्या बिझनेसमन बॉयफ्रेंडशी साखरपुडाही केला आहे. ज्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.

दिव्या अग्रवाल आणि वरुण सूद यांचं काही महिन्यांपूर्वीच ब्रेकअप झालं होतं. त्यानंतर आता दिव्याने तिच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर बॉयफ्रेंड अपूर्व पाडगांवकरबरोबरचे फोटो शेअर नात्याची कबुली दिली आहे. दिव्याच्या ३० व्या वाढदिवचं निमित्त साधत अपूर्वने तिला अंगठी घालून लग्नासाठी प्रपोज केलं. सोशल मीडियावर शेअर केलेल्या या फोटोंमध्ये दिव्या अग्रवाल तिची अंगठी दाखवताना दिसत आहे. या फोटोंमध्ये तिने अपूर्वबरोबर रोमँटिक पोझ दिल्या आहेत. तिचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आणखी वाचा- “वरुणचं कॅरेक्टर…”, मधुरीमा रॉयसोबत अफेअरच्या चर्चांवर एक्स गर्लफ्रेंड दिव्या अग्रवालनं सोडलं मौन

इन्स्टाग्रामवर बॉयफ्रेंड अपूर्व पाडगांवकरबरोबरचे फोटो शेअर करताना लिहिलं, “मी कधी हसणं बंद करू शकेन का? कदाचित नाही. माझ्या आयुष्यात प्रकाशाचा आणखी एक किरण आला आहे आणि आयुष्याचा हा प्रवास शेअर करण्यासाठी मला एक योग्य व्यक्ती मिळाली आहे. त्याची बायको, हे कायमचं वचन आहे. यापुढे मी कधीच एकटी चालणार नाही.” दिव्याच्या या पोस्टवर अनेक चाहते आणि टीव्ही कलाकारांनी कमेंट करून तिला नव्या आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. दिव्या अग्रवालचा होणारा नवरा अपूर्व पाडगांवकर एक बिझनेसमन असून त्याची मुंबईमध्ये अनेक हॉटेल्स आणि रेस्टॉरंट आहेत.

आणखी वाचा- FIFA World Cup 2022 मध्ये दीपिका पदुकोणकडे महत्त्वाची जबाबदारी, पहिल्यांदाच भारतीय अभिनेत्रीला मिळालाय हा सन्मान!

दिव्या अग्रवालबद्दल बोलायचं तर ती मागची काही वर्षं अभिनेता वरुण सूदला डेट करत होती. दोघंही बराच काळ एकमेकांबरोबर होते आणि दरम्यानच्या काळात त्यांच्या लग्नाच्या चर्चांनाही उधाण आलं होतं. पण मार्च २०२२ मध्ये त्यांचं ब्रेकअप झाल्याचं समोर आलं. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिव्याने याची माहिती दिली होती. आता ब्रेकअपच्या ९ महिन्यानंतर तिने अपूर्व पाडगांवकरशी साखरपुडा उरकला आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन ( Television ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-12-2022 at 13:26 IST
Next Story
Video: “अंघोळ घालतेय राखी सावंत…” ड्रामा क्वीनने फ्लर्ट केल्यानंतर जागा झाला प्रसाद जवादेमधील रॅपर; घरातील सदस्यांनाही हसू अनावर