Divyanka Tripathi shares pregnancy cravings : दिव्यांका त्रिपाठी हिंदी टेलिव्हीजनवरील लोकप्रिय अभिनेत्री आहे. दिव्यांका सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी तिने एक गुड न्यूज तिच्या चाहत्यांसह शेअर केली होती. ही आनंदाची बातमी म्हणजे दिव्यांका लवकरच आई होणार आहे.
दिव्यांका त्रिपाठीने आतापर्यंत मालिका आणि रिअॅलिटी शोमध्ये काम करत प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. पण, ती खऱ्या अर्थाने प्रसिद्धीझोतात आली ते स्टार प्लसवरील ‘ये है मोहब्बतें’ या मालिकेमुळे. अशातच आता गरोदरपणामुळे जरी दिव्यांकाने कामातून ब्रेक घेतला असला तरी ती तिच्या यूट्यूब चॅनेलमार्फत तिच्या चाहत्यांच्या संपर्कात आहे. अशातच आता गरोदरपणादरम्यान ती काय काय करत आहे या सगळ्याबद्दलसुद्धा ती यामधून सांगत आहे. नुकताच तिने एक व्लॉग पोस्ट केला आहे. ज्यामध्ये तिच्या मैत्रिणीने तिला एक सरप्राइज दिलं आहे. यामध्ये दिव्यांकाने तिला गरोदरपणात कशाचे डोहाळे लागले आहेत याबद्दलही सांगितलं आहे. तसेच ती सध्या काय काय खात आहे याबद्दलही बोलली आहे.
दिव्यांका त्रिपाठीला लागलेत डोहाळे
दिव्यांका या व्हिडीओतून म्हणाली, “मला आधी दुध प्यायला आवडायचं नाही. पण, मी आता दूध प्यायला लागले आहे. वेळची केळीसुद्धा खात आहे जे विवेकला खूप आवडतात. जे मी आधी अजिबात खायची नाही दूध, फळं हे सर्व मी आता खात आहे.”
व्हिडीओमध्ये पुढे तिचा नवरा विवेक दहिया म्हणाला, “दिव्यांकाला आंबे आवडत नाही. तिने कधीच आंबे खाल्ले नाहीयेत. पण, मी लहानपणी खूप आंबे खाल्ले आहेत. त्यामुळे माझ्या बाळालाही आवडेल असं मला वाटतं.” यावेळी त्याने सांगितलं की दिव्यांका जे खाते त्यातलं बाळाला काही आवडलं की तो पोटात लात मारतो ज्यानंतर त्यांना कळतं की तो पर्दाथ बाळाला आवडत आहे.
काही दिवसांपूर्वीच दिव्यांकाचा डोहाळ जेवणाचा कार्यक्रम पार पडला. ज्याला अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. दिव्यांका व विवेक यांच्या लग्नाला दहा वर्षे झाली आहेत. लग्नाच्या दहा वर्षांनंतर या जोडीने आई-बाबा होण्याचा निर्णय घेतला आणि आता वयाच्या ४१ व्या वर्षी अभिनेत्री आई होणार आहे. दिव्यांका अलीकडेच विकी ललवाणीशी संवाद साधताना तिच्या बाळाचा जन्म जून महिन्यात होणार असल्याचं म्हटलं होतं. यावेळी तिने त्यांना आता आई-बाबा व्हावसं वाटलं आणि म्हणून त्यांनी त्यासाठी प्रयत्न केले आणि त्यांना ही आनंदीची बातमी मिळाली.
