ज्ञानदा रामतीर्थकर मराठी मालिका विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. मालिकांमधील सोज्वळ, सुंदर भूमिकांमुळे तिने अनेकांची मनं जिंकली आहेत. पण खऱ्या आयुष्यातसुद्धा ज्ञानदा तशीच असल्याचं दिसतं. ज्ञानदा सोशल मीडियावर खूप सक्रीय असते आणि तिच्या दैनंदिन जिवनातील घडामोडी शेअर करत असते. अशातच आता तिने तिच्या मंगळागौरनिमित्तचा एक व्हिडीओ शेअर केला आहे.

ज्ञानदा रामतीर्थकरने गेल्या काही दिवसांपूर्वी हर्षद गायकवाडसह थाटामाटात आणि पारंपरिक पद्धतीने लग्न केलं. दोघांच्या लग्नातील व्हिडीओ व फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले. आता अभिनेत्री लग्नानंतरचे सर्व सण, कार्यक्रम पारंपरिक पद्धतीने साजरे करत आहे. अशातच आता तिने मंगळगौरनिमित्तचा एक व्हिडीओ शेअर केला आहे.

ज्ञानदाने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ती पारंपरिक अदांजात तयार झालेली पाहायला मिळत आहे तर पांरपरिक पद्धतीने अभनित्री मंगळागौर पुजन करताना दिसत आहे. या व्हिडीओला तिने ‘मंगळागौर पुजन’ अशी कॅप्शन दिली आहे. यामध्ये तिने तिचा नवरा हार्षदसाठी खास उखाणाही घेतला असून त्याच्याबरोबर ती मंगळागौरचे खेळ खेळतानाही दिसत आहे.

व्हिडीओच्या सुरुवातीला ज्ञानदा मंगळागौरनिमित्त नवऱ्याबरोबर पुजा करताना दिसत आहे. यावेळी तिच्या मंगळागौरच्या कार्यक्रमाला तिच्या कुटुंबातील सर्व जण उपस्थित असून तिच्याबरोबर मंगळागौरचे खेळ खेळताना दिसत आहेत. यावेळी ज्ञानदाच्या नवऱ्याने तिला उचलून घेतल्याचंही दिसतं. ज्ञानदाने तिच्या मंगळागौरनिमित्त खणाची साडी नेसली असून त्यावर साजेसा सुंदर असा ब्लाऊज परिधान केला आहे. तिच्या या ब्लाऊजवर चंद्राची रेखीव डिझाईन आहे. गळ्यात मंगळसूत्रांसह पारंपरिक दागिने परिधान केल्याचं दिसत आहे. तिने यावेळी हातामध्ये हिरवा चुडा आणि नाकात नथ परिधान केली आहे. केसात गजरा आणि कपाळी सुंदर चंद्रकोर लावत ज्ञानदाने तिचा लूक पूर्ण केला आहे.

ज्ञानदाने नवऱ्यासाठी घेतला उखाणा

ज्ञानदाने यावेळी “मे महिन्यात लग्न झालं आमचं बघता बघता आला महिना श्रावण सासर माहेरच्यांच्या साक्षीने हर्षद रावांचं नाव घेऊन करते मी मंगळागौरीची पुजन” असा उखाणा घेतला आहे. यावेळी तिच्याबरोबर तिच्या कुटुंबातील स्त्रीय तिच्याबरोबर मंगळागौरचे विविध सण खेळाताना दिसत असून तिच्या सासूबाईसुद्धा यावेळी उपस्थित असल्याचं दिसतं.