Dnyanada Ramtirthkar mother in law praises actress: ज्ञानदा रामतीर्थकर सध्या लग्नानंतर ‘होईलच प्रेम’ या मालिकेत काम करत आहे. या मालिकेतील तिची काव्या ही भूमिका प्रचंड लोकप्रिय ठरली आहे. आता ज्ञानदा तिच्या व्यावसायिक नाही तर वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. तिच्या सासूने तिच्याबद्दल केलेले वक्तव्य लक्ष वेधून घेत आहे.

“ती आता आमच्या घरात..”

ज्ञानदाचा लग्नानंतरचा हा पहिला गणेशोत्सव आहे. सासरी तिने मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा केल्याचे पाहायला मिळते. याच निमित्ताने ज्ञानदा व तिच्या कुटुंबाने राजश्री मराठीशी संवाद साधला. ज्ञानदाच्या सासूने ज्ञानदाबद्दल वक्तव्य केले. त्या म्हणाल्या, “ती आता आमच्या घरात रूळली आहे. तसं म्हणायला गेलं तर तिची तारेवरची कसरत आहे; म्हणजे मुंबई, तिचं माहेर आणि आमच्या इथे निगडी असं करताना तिची तारेवरची कसरत होते. तेवढं करतानाही ती उत्साही असते. कधी माहेरी जाते, कधी सासरी जाते याची तिला घाई असते. आम्हालाही ती आल्यानंतर छान वाटतं. एका दिवसासाठी येते, पण आम्हाला छान वाटतं.”

ज्ञानदा रामतीर्थकर (फोटो सौजन्य: इन्स्टाग्राम)
ज्ञानदा रामतीर्थकर व हर्षद गायकवाड (फोटो सौजन्य: इन्स्टाग्राम)

पुढे ती म्हणाली, “महत्त्वाचं म्हणजे ती अभिनेत्री आहे, हिरोईन आहे, स्टार आहे असं वागत नाही. आमच्या घरी आल्यानंतर ती अगदी आमच्यासारखीच झाली आहे. आमचं कुटुंब हसून खेळून राहणारं आहे, त्यामध्ये ती छान रूळली आहे.”

ज्ञानदा रामतीर्थकर (फोटो सौजन्य: इन्स्टाग्राम)
ज्ञानदा रामतीर्थकर (फोटो सौजन्य: इन्स्टाग्राम)

त्यांना पुढे विचारले की, ज्ञानदाने ‘ठिपक्यांची रांगोळी’ या मालिकेत साकारलेली अप्पू ही भूमिका आवडली की ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ या मालिकेतील काव्या ही भूमिका आवडली की ज्ञानदा आवडते? यावर त्या म्हणाल्या, “तसं बघायला गेलं तर ज्ञानदाच जास्त आवडते. अप्पू किंवा काव्या ही तिने साकारालेली पात्रे आहेत, पण ज्ञानदा परफेक्ट आहे”, असे म्हणत ज्ञानदाच्या सासूने तिचे कौतुक केले.

ज्ञानदा रामतीर्थकर (फोटो सौजन्य: इन्स्टाग्राम)
ज्ञानदा रामतीर्थकर (फोटो सौजन्य: इन्स्टाग्राम)

दरम्यान, ज्ञानदा व हर्षद गायकवाडने काही महिन्यांपूर्वीच लग्नगाठ बांधली आहे.