Drama Juniors : ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘ड्रामा ज्युनिअर्स’ हा लोकप्रिय कार्यक्रम सध्या चांगलाच सुरू आहे. या कार्यक्रमात अतरंगी मुलांचा बहुरंगी अभिनय पाहायला मिळत आहे. अशातच सध्या ‘ड्रामा ज्युनिअर्स’मधील एक व्हिडीओ खूप व्हायरल झाला आहे. यामध्ये प्रवीण तरडे ‘ड्रामा ज्युनिअर्स’मधील बालकलाकारांचं कौतुक करताना दिसत आहेत.

‘ड्रामा ज्युनिअर्स’ ( Drama Juniors ) कार्यक्रमात या आठवड्यात ‘धर्मवीर २’ चित्रपटातील कलाकार मंडळी उपस्थित राहणार आहेत. नुकताच ‘झी मराठी’च्या सोशल मीडियाच्या पेजवर ‘ड्रामा ज्युनिअर्स’चा एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओत, ‘धर्मवीर’ चित्रपटातील गुरुपौर्णिमेचा सीन बालकलाकारांनी रिक्रिएट केलेला पाहायला मिळत आहे. दुर्वने दिवंगत बाळासाहेब ठाकरेंची भूमिका साकारली आहे. तर अर्जुन आनंद दिघेंच्या भूमिकेत दिसत आहे. बालकलाकारांनी केलेला हाच सीन पाहून ‘धर्मवीर’ चित्रपटाचे दिग्दर्शक प्रवीण तरडे भारावून गेले. प्रवीण तरडे बालकलाकारांचा परफॉर्मन्स पाहून म्हणाले, “इथे गुरुशिष्याची परंपरा आहे. तुम्ही अक्षरशः डोळ्यात पाणी आणलंत.”

bigg boss marathi varsha usgoanker left b team and make strategy with nikki
५३ दिवसांनी वर्षा उसगांवकरांनी गेम बदलला! निक्कीशी हातमिळवणी करत ‘टीम B’मधून एक्झिट, नेटकरी म्हणाले…
bigg boss marathi arbaz patel second time captain of the house
Bigg Boss Marathi : अरबाज पटेल दुसऱ्यांदा झाला…
Aarya Jadhao choose top 5 of Bigg Boss Marathi 5
तुझ्यासाठी Bigg Boss Marathi तील टॉप ५ सदस्य कोण? आर्या जाधवने घेतली फक्त ‘ही’ चार नावं, म्हणाली…
Navri Mile Hitlerla Fame Bhumija Patil Won Home Minister Paithani
Video: ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेतील अभिनेत्रीला मिळाली सव्वा लाखाची पैठणी, अनुभव सांगत म्हणाली, “आदेश भाऊजींच्या…”
bigg boss marathi vaibhav chavan express his feelings
“मला ‘अरबाज-२’, ‘बैल’ अशी नावं पाडली, पण आता…”, घराबाहेर आल्यावर वैभवचा निर्धार; म्हणाला, “ट्रॉफी बारामतीत…”
bigg boss marathi arbaz patel mother reaction
निक्कीशी असलेली जवळीक अरबाजच्या आईला खटकली; फरीदा म्हणाल्या, “टीव्हीवर दिसतंय ते लोकांना सुद्धा…”
Bigg Boss Marathi Season 5 Kapil Honrao Target To sangram chougule
“वाइल्ड कार्ड एन्ट्री…”, संग्राम चौगुलेवर टीका करत मराठी अभिनेत्याने अरबाजचं केलं कौतुक, म्हणाला…
bigg boss marathi pandharinath kamble fight with suraj chavan
Video : “अरे मध्ये नको बोलूस…”, पंढरीनाथ सूरजवर भडकला, अंकिताने मध्यस्थी केली पण…; प्रोमो पाहून काय म्हणाले नेटकरी?
arbaz flirt with jahnavi watch nikki tamboli reaction
Video : “जान्हवी तुझे डोळे किती सुंदर आहेत”, अरबाज ‘ते’ विधान ऐकताच निक्की म्हणाली, “बाई मी खूप…”

हेही वाचा – ‘सख्खा भाऊ पक्का वैरी’नंतर मिलिंद गवळींना मिळालेले ४० चित्रपट, जुन्या आठवणी सांगत म्हणाले…

हेही वाचा – Bigg Boss Marathi : “हिल हिल पोरी हिला…”, दादा कोंडकेंच्या गाण्यावर निक्की तांबोळी व अरबाज पटेलचा जबरदस्त डान्स, पाहा व्हिडीओ

दरम्यान, ‘ड्रामा ज्युनिअर्स’ ( Drama Juniors ) कार्यक्रमातील अतरंगी लहान मुलांचं परीक्षण अभिनेत्री अमृता खानविलकर व अभिनेता संकर्षण कऱ्हाडे करत आहेत. तसंच सूत्रसंचालनाची जबाबदारी अभिनेत्री जबाबदारी ‘झी मराठी’च्या जुन्या व लोकप्रिय कलाकाराकडे देण्यात आली आहे. ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री श्रेया बुगडे ‘ड्रामा ज्युनिअर्स’ कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करत आहे.

हेही वाचा – ‘नवरा माझा नवसाचा २’मधील पहिलं गाणं कधी येणार? सचिन पिळगांवकरांनी गायकाबरोबरचा फोटो शेअर करत दिली माहिती

धर्मवीर २’ चित्रपट कधी प्रदर्शित होणार?

प्रवीण तरडे दिग्दर्शित ‘धर्मवीर २’ चित्रपट २७ सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे. याआधी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख ९ ऑगस्ट होती. पण काही दिवसांपूर्वी प्रदर्शनाची तारीख बदल्यात आली. या चित्रपटात अभिनेता प्रसाद ओकसह क्षितीज दाते, आनंद इंगळे, जयवंत वाडकर, अभिजीत खांडकेकर, हार्दिक जोशी, ऋतुराज फडके असे अनेक कलाकार पाहायला मिळत आहेत.