Ekta Kapoor Daily Routine : मनोरंजनविश्वातील मंडळींचं वेळापत्रक खूप व्यग्र असतं. त्यांना सामान्य माणसांच्या तुलनेत दिवसातील अधिक तास काम करावं लागतं. अनेक कलाकार मंडळी, निर्माते, दिग्दर्शक काहीवेळा दिवसाला १५ तासही काम करतात असं ते अनेकदा बोलताना दिसतात. मागे यावरून दीपिका पादुकोणने कामाच्या तासांबद्दल केलेल्या मागणीनंतर मोठा गदारोळ झालेला.
पडद्यावर काम करणारे कलाकार, विशेष करून मालिका विश्वात काम करणारे कलाकार दिवसाला १२ तासांहून अधिक काळ काम करत असतात. परंतु, त्यांच्याबरोबर पडद्यामागून काम करणारी मंडळीसुद्धा त्यांच्या इतकंच किंबहुना अधिक काम करत असतात. दररोज अगणित तास काम करत असल्याने त्यांचं वेळापत्र खूप व्यग्र असतं आणि यामुळे त्यांना त्यांच्या कुटुंबाला देण्यासाठी फार कमी वेळ उरतो. अशातच आता टेलिव्हिजनवरील लोकप्रिय निर्माती एकता कपूरने तिच्या वेळापत्रकाबद्दल सांगितलं आहे. तिचं वेळापत्रक ऐकून तुम्ही थक्क व्हाल असं तिने स्वत: म्हटलं आहे.
एकता कपूरचं वेळापत्रक खूप व्यग्र असून तिचा दिवस उशिराने सुरू होतो आणि उशिराच संपतो असं तिने सांगितलं आहे. यामधून ती तिच्या मुलाची काळजी कशी घेते आणि कुटुंबासाठी कसा वेळ मिळतो याबद्दलही ती बोलली आहे. एकता तिच्या वेळापत्रकाबद्दल नेमकं काय म्हणाली आणि तिचं वेळापत्रक कसं आहे याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात…
‘असा’ असतो एकता कपूरचं डेली रूटीन
एकता पुढे म्हणाली, “मी माझ्या मुलाला शाळेत आणायला जाते आणि त्यानंतर आईकडे ठेवते. पुढे मी व्यायाम करते. मग ४ वाजता मी ऑफिसला जाते. ऑफिसला गेल्यानंतर पहाटे ४ वाजता मी माझं काम संपवते. हे मधले १२ तास आम्ही ऑफिसात असतो.”
दरम्यान, एकता कपूर हिंदी टेलिव्हिजनवरील मोठं नाव आहे. तिने आतापर्यंत अनेक लोकप्रिय हिंदी व मराठी मालिकांची निर्मिती केली आहे. तिने अनेक नवोदित कलाकारांना संधी दिली आहे. आज ते कलाकार फक्त मालिकाच नव्हे तर चित्रपटांमध्येही झळकत आहेत.
