‘क्योंकी सास भी कभी बहू थी’ ही एकेकाळची टीव्हीवरील सर्वात लोकप्रिय मालिका आहे. ही मालिका बंद होऊन बरीच वर्षे लोटली आहेत, पण आजही प्रेक्षक त्याबद्दल बोलत असतात. या मालिकेत तुलसी विरानीची भूमिका आता भाजपा नेत्या असलेल्या स्मृती इराणी यांनी साकारली होती. त्यांना ही भूमिका कशी मिळाली होती, याबाबत त्यांनी माहिती दिली होती. त्यावर एकता कपूरने प्रतिक्रिया देत स्मृती इराणींचा दावा फेटाळला आहे.

स्मृती इराणी काय म्हणाल्या होत्या?

‘कर्ली टेल्स’ ला दिलेल्या मुलाखतीत स्मृती इराणी यांनी त्यांना ‘क्योंकी सास भी कभी बहू थी’ मालिकेतील तुलसीची भूमिका कशी मिळाली होती, याबाबत सांगितलं होतं. “मला कोणत्याही व्यक्ती किंवा व्यक्तिमत्वामुळे किंवा इतर कशामुळेही ही भूमिका मिळाली नव्हती. एकता कपूरच्या ऑफीसमध्ये एक ज्योतिष बसले होते. त्यांनी म्हटलं की ती मुलगी कोण आहे, तिला थांबवा. मग एकताने विचारलं की हिला का थांबवायचं, तर ज्योतिष म्हणाले तुम्ही जर हिला थांबवून काम दिलं तर ही देशातील खूप प्रसिद्ध व्यक्ती होईल,” असं स्मृती इराणी म्हणाल्या होत्या. ज्योतिषाने असं म्हटल्यावर ही भूमिका मिळाल्याचं त्यांनी सांगितलं होतं.

फक्त १८०० रुपयांसाठी फूड स्टोअरमध्ये काम करायच्या स्मृती इराणी, ज्योतिषाची ‘ती’ भविष्यवाणी ऐकली अन् एकता कपूरने…

पुढे त्या म्हणाल्या होत्या, “आधी माझी निवड दुसऱ्या भूमिकेसाठी झाली होती पण ज्योतिषाच्या बोलण्यानंतर एकताने मला तुलसी विरानीच्या भूमिकेसाठी घेतलं. त्या भूमिकेसाठी मला दिवसाला १८०० रुपये मानधन दिलं होतं. मी तर फक्त १२०० रुपये पर डे मागितले होते, पण तिने स्वतःच तितकं मानधन दिलं होतं. त्यावेळी मला आयुष्यात लॉटरी जिंकल्यासारखं वाटत होतं.”

“आराध्या १२ वर्षांची आहे, पण ती…”, नव्या नवेलीचं मामाच्या मुलीबद्दल विधान; म्हणाली, “तिला मी कोणताही…”

एकता कपूरने काय म्हटलंय?

एका मुलाखतीत स्मृती इराणी यांनी दावा केला होता की एकता कपूरच्या ऑफीसमधील एका ज्योतिषाने स्मृती यांची या भूमिकेसाठी शिफारस केली होती. पण हे खोटं असल्याचं एकताने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये म्हटलं आहे. स्मृती इराणी या भूमिकेसाठी त्यांची निवड कशी झाली हे सांगणारा व्हिडीओ एकता कपूरने इन्स्टाग्रामवर शेअर करत लिहिलं, “हे खोटं आहे.!!! मोनिशा, तुझी ऑडिशन मिळाली, ती आम्ही पाहिली आणि एका सेकंदात तुला या भूमिकेसाठी निवडलं.”