ex big boss marathi contestant meera jagannath now playing villan in tharl tar mag new serial spg 93 | | Loksatta

‘बिग बॉस’ मराठीच्या घरातून बाहेर पडल्यावर मीरा जगन्नाथ करणार ‘कट कारस्थान’; पोस्ट चर्चेत

‘येऊ कशी तशी मी नांदायला’ मालिकेतील तिने साकरलेली ‘मोमो आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे

‘बिग बॉस’ मराठीच्या घरातून बाहेर पडल्यावर मीरा जगन्नाथ करणार ‘कट कारस्थान’; पोस्ट चर्चेत
फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम

‘बिग बॉस’ मराठीच्या घरातून कालच मीरा जगन्नाथ आणि विशाल निकम बाहेर पडले. दोन आठवड्यांपूर्वी ४ स्पर्धकांची या कार्यक्रमात वाईल्ड कार्ड एंट्री झाली होती. मात्र काल हे दोन स्पर्धक बाहेर पडले. यातील अभिनेत्री मीरा जगन्नाथ आता आपल्याला एक नव्या रूपात दिसणार आहे. तिने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे.

मीरा जगन्नाथ ‘बिग बॉस मराठी ३’ शोमुळे घराघरात पोहोचली. स्टार प्रवाहावरील एका नव्या मालिकेत ती आता आपल्याला दिसणार आहे. या मालिकेचे नाव आहे ‘ठरलं तर मग’, ही मालिका स्टार प्रवाह वाहिनीवर सोमवार ते शुक्रवार रात्री ८. ३० वाजता प्रेक्षकांच्या भेटीस येईल. या मालिकेत तिच्या पात्राचे नाव साक्षी असून हे पात्र कटकारस्थान दाखवण्यात येणार आहे.

‘येऊ कशी तशी मी नांदायला’ मालिकेतील तिने साकरलेली ‘मोमो’ ही व्यक्तिरेखा चाहत्यांच्या पसंतीस उतरली होती. मीराचा चाहता वर्ग मोठा असून ती सोशल मीडियावरून चाहत्यांच्या संपर्कात राहते. ‘बिग बॉस’ मराठी ३मध्ये सहभागी झालेली मीरा पहिल्या दिवसापासून चर्चेत राहिली होती.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन ( Television ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 05-12-2022 at 17:04 IST
Next Story
“हीच अभिनेत्री माझी जागा घेण्यास पात्र” ‘द कपिल शर्मा शो’दरम्यान अर्चना पूरण सिंग यांचा खुलासा