टीव्ही जगतात आवडीने बघितली जाणारी मालिका म्हणजे ‘आई कुठे काय करते’, काही महिने सतत टीआरपीमध्ये पहिल्या क्रमांकावर ही मालिका होती. कुटुंबातील सदस्यांसाठीकायम उभी राहणारी मात्र तीच स्वतःच अस्तित्व नसणारी अशी आई या मालिकेत दाखवण्यात आली होती मात्र आता त्याच आईने आपल्या कर्तृत्वावर स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. नुकतेच या मालिकेने ८०० भाग पूर्ण केले आहेत. मालिकेची लेखिका मुग्धा गोडबोले यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ही माहिती दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लेखिका मुग्धा गोडबोले यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहलं आहे ‘८००!! सीमोल्लंघन’, अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. लेखिका मुग्धा गोडबोले या उत्तम अभिनेत्रीदेखील आहेत. त्या मूळच्या पुण्याच्या आहेत. लेखिका मंगला गोडबोले यांच्या त्या कन्या आहेत. राज्य नाट्यस्पर्धांमधून अभिनय करत त्यांनी पुढे ‘कळत नकळत’, ‘चार दिवस सासूचे’ यांसारख्या मालिकांमधून काम केले आहे.

“रेल्वे स्टेशनवरील पाणी बिसलेरीपेक्षा…” सोनू सूदने शेअर केला मुंबई लोकलचा अनुभव

दर्जेदार संवाद, घराघरात घडणाऱ्या गोष्टींचे प्रतिबिंब या मालिकेतील भागांमधून दिसून येते. मालिकेतील कलाकारांचे अभिनय, संवाद यामुळे ही मालिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडली आहे. या मालिकेत आईची भूमिका साकारली आहे अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर यांनी, त्यांच्या भूमिकेचे कौतुक कायमच प्रेक्षकांकडून होत असतं. ही मालिका दर सोमवार ते शनिवार संध्याकाळी ७. ३०ला स्टार प्रवाह या वाहिनीवर प्रक्षेपित होते. तसेच डिस्ने हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवरदेखील मालिकेचे भाग प्रदर्शित होतात.

‘आई कुठे काय करते’ या लोकप्रिय मराठी मालिकेला प्रेक्षकांनी खूप प्रेम दिले आहे. ‘आई कुठे काय करते’ या मालिकेने लोकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले आहे.अभिनेते मिलिंद गवळी, अभिनेत्री अर्चना पाटकर, किशोर महाबोले दिग्गज कलाकार काम करत आहेत. याच मालिकेचे हिंदी रूपांतर केले आहे. ‘अरुंधती’ या नावाने हिंदीत मालिका प्रक्षेपित होते. ज्यात अभिनेत्री रूपा गांगुली मुख्य भूमिकेत आहे

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Famous marathis serial aai kuthe kay karte completed 800 episodes spg
First published on: 05-10-2022 at 11:11 IST