scorecardresearch

फिफा वर्ल्ड कपवर अर्जेंटिनाने नाव कोरल्यानंतर गौरव मोरेने शेअर केला लिओनेल मेस्सीचा फोटो, म्हणाला…

Fifa world cup 2022: गौरव मोरने मेस्सीचा फोटो शेअर करत केलं कौतुक

फिफा वर्ल्ड कपवर अर्जेंटिनाने नाव कोरल्यानंतर गौरव मोरेने शेअर केला लिओनेल मेस्सीचा फोटो, म्हणाला…
गौरव मोरेने शेअर केला मेस्सीचा फोटो. (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

फिफा विश्वचषक २०२२ वर अर्जेंटिनाने नाव कोरलं. फ्रान्स व अर्जेंटिनामध्ये रविवारी(१८ नोव्हेंबर) विश्वचषकाचा उत्कंठावर्धक सामना रंगलेला पाहायला मिळाला. अर्जेंटिनाच्या विजयाचा शिल्पकार असलेल्या लिओनेल मेस्सीवर जगभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

मनोरंजन विश्वातील अनेक फुलबॉलप्रेमी सेलिब्रिटीही मेस्सीचं कौतुक करत आहेत. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेला गौरव मोरेही मेस्सीचा चाहता आहे. विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात मेस्सीच्या नेतृत्वाखाली अर्जेंटिना संघाने केलेल्या कामगिरीमुळे सगळेच भारावून गेले. मेस्सीच्या खेळाने गौरव मोरेही प्रभावित झाला आहे. अंतिम सामना संपल्यानंतर गौरवने मेस्सीचा फोटो शेअर करत त्याचं कौतुक केलं आहे.

हेही वाचा>> लिओनेल मेस्सीसाठी पत्नीने अर्धवटच सोडलं होतं डेन्टिस्ट व्हायचं स्वप्न; जाणून घ्या मॉडेल असलेल्या एंटोनेला रोकुजोबद्दल

गौरवने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये मेस्सीचा विश्वचषकाला चुंबन घेतानाचा फोटो शेअर केला आहे. २०१४ साली मेस्सीचं वर्ल्ड कप जिंकण्याचं स्वप्न अर्धवट राहिलं होतं. म्हणूनच या स्टोरीला गौरवने “स्वप्न सत्यात उतरलं” असं कॅप्शन दिलं आहे. गौरवच्या या पोस्टने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

हेही वाचा>>‘बिग बॉस’च्या घरातून अमृता देशमुख बाहेर; विकास सावंत पाठोपाठ ‘पुण्याच्या टॉकरवडी’ची एग्झिट

lionel messi

हेही पाहा>> “महाराजांचे नाव घेऊन सनातनी हिंदूला मारणे, हे…” केतकी चितळेचं वक्तव्य चर्चेत

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमातून लोकप्रियता मिळवलेला गौरव चित्रपटांतही झळकला आहे. ऑक्टोबर महिन्यात प्रदर्शित झालेल्या हवाहवाई चित्रपटात तो दिसला होता. त्यानंतर एका चित्रपटाच्या शूटिंगसाठी गौरव लंडनला गेला होता.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन ( Television ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 19-12-2022 at 11:45 IST

संबंधित बातम्या