स्टार प्रवाहवरील ‘फुलाला सुगंध मातीचा’ या मालिकेला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला होता. या मालिकेच्या कथानकात नेहमीच विविध ट्विस्ट पाहायला मिळाले होते. मालिकेत किर्तीची भूमिका अभिनेत्री समृद्धी केळकरने साकारली होती. या मालिकेने तिला घराघरात पोहचवले. या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतल्याने समृद्धीचे चाहते नाराज झाले होते. मात्र आता त्यांच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. समृद्धी लवकरच छोट्या पडद्यावर परतणार आहे.

समृद्धी केळकर सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत असते. फुलाला सुंगध मातीचा या मालिकेत तीन सुनेच्या भूमिकेत दिसली होती. मात्र आता ती स्टार प्रवाहवरील कार्यक्रमात सुत्रसंचालकाच्या भूमिकेत दिसणार आहे. ‘मी होणार सुपरस्टार जल्लोष ज्युनियर्स’चा या कार्यक्रमातुन ती आपल्या भेटीस येणार आहे. या कार्यक्रमात अभिनेता अंकुश चौधरी परिक्षकाच्या भूमिकेत असणार आहे. हा कार्यक्रम १८ फेब्रुवारीपासून सुरु होणार असून सध्या या कार्यक्रमाचा प्रोमो व्हायरल होत आहे.

Watch waiter’s priceless reaction to sketch artist's sweet surprise
न मिळालेल्या कौतुकाची पोचपावती! कलाकारानं हॉटेलच्या बिलवर रेखाटलं वेटरचं सुरेख चित्र; चेहऱ्यावर उमटलं सुंदर हास्य, Video Viral
Loksatta kalakaran Architecture heritage and reality
कलाकारण: वास्तुरचना, वारसा आणि वास्तव!
tigress archi video marathi news, loksatta tiger video marathi news
VIDEO: आर्चीच्या बछड्यांची ‘मस्ती की पाठशाला’, टिपेश्वरच्या जंगलातील दंगामस्ती कॅमेऱ्यात कैद
artificial intelligence generating revolution in film industry
कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्तेने चित्रपटांना संजीवनी

समृद्धी एक उत्तम अभिनेत्रीच आहेच मात्र ती एक उत्तम नृत्यांगनादेखील आहे. तिने कथ्थकमध्ये अलंकारची पदवी घेतली आहे. समृद्धीने याआधी ‘लक्ष्मी सदैव मंगलम’ या मालिकेत भूमिका साकारली आहे. तसेच तिने ‘पुढचं पाऊल’ व ‘लेक माझी लाडकी’ या मालिकांमध्येही भूमिका साकारल्या आहेत. लावणीवर आधारित असलेल्या ‘ढोलकीच्या तालावर’ या डान्स शोमध्येही ती सहभागी झाली होती