Premium

Ganesh Chaturthi 2023: ढोल ताशांच्या गजरात ‘ठरलं तर मग’ फेम अमित भानुशालीच्या घरच्या बाप्पाचं आगमन; पाहा व्हिडीओ

‘या’ कलाकारांच्या घरच्या बाप्पाचं आगमन पाहा…

ganesh chaturthi 2023 tharla tar mag fame amit bhanushali
'या' कलाकारांच्या घरच्या बाप्पाचं आगमन पाहा…

वर्षभर ज्या दिवसाची प्रत्येक जण आतुरतेने वाट पाहत असतो, तो दिवस अखेर उजाडला आहे. आज गणेश चतुर्थी निमित्तानं सगळीकडे लाडक्या गणरायचं आगमन होतं आहे. यामुळे एक वेगळाच उत्साह पाहायला मिळत आहे. गणपती बाप्पा मोरया….मंगलमूर्ती मोरया…. अशा जयघोषात, ढोल ताशांच्या गजरात, धूमधडाक्यात बाप्पाचं आगमन होतं आहे. घरोघरी चैतन्याचं आणि मंगलमय वातावरण पाहायला मिळत आहे. कलाकार मंडळींच्या घरच्या गणपती बाप्पाचं देखील दिमाखात आगमन झालं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – “हा मला एका महिन्यात मिळालेला दुसरा राष्ट्रीय पुरस्कार”; गायक सलील कुलकर्णींच्या ‘त्या’ पोस्टनं वेधलं लक्ष

लोकप्रिय मालिका ‘ठरलं तर मग’ मधील अर्जुन म्हणजेच अमित भानुशालीच्या घरच्या बाप्पाचं आगमन ढोल ताशांच्या गजरात झालं आहे. बाप्पाच्या स्वागतासाठी अमित आपल्या कुटुंबीयांबरोबर पोहोचला होता. ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात अमितने घरच्या बाप्पाचं स्वागत केलं. यावेळी त्याच्याबरोबर पत्नी आणि मुलगा पाहायला मिळाला. याचा व्हिडीओ ‘स्टार प्रवाह’च्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.

हेही वाचा – “मुक्ताच्या आणखी प्रेमात पडावं…” लेखक क्षितिज पटवर्धनची ‘ती’ पोस्ट चर्चेत, म्हणाला…

हेही वाचा : गौरी सावंत यांच्याबरोबर ‘ताली’ टीमनं पाहिलं ‘चारचौघी’ नाटक; रवी जाधव म्हणाले, “असं क्वचितच…”

अमित व्यतिरिक्त ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेतील जयदीप म्हणजेच मंदार जाधवच्या घरच्या बाप्पाचं आगमन झालं आहे. कुटुंबीयांबरोबर मंदार बाप्पाच्या स्वागतासाठी पोहोचला होता. याचा देखील व्हिडीओ ‘स्टार प्रवाह’च्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओत मंदारच्या घरच्या बाप्पाचं दर्शन झालं आहे.

हेही वाचा – Video: अविनाश-ऐश्वर्या नारकरांनी केलेलं ‘आमच्या पप्पांनी गणपती आणला’चं नवीन व्हर्जन पाहिलंत का? व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले…

दरम्यान, बऱ्याच कलाकारांच्या घरी आज बाप्पाचं आगमन झालं आहे. सुप्रिया पाठारे, स्वप्नील जोशी, श्रेयस तळपदे, पूजा सावंत, सुबोध भावे, प्रार्थना बेहेरे अशा अनेक कलाकारांच्या घरी बाप्पाचं विराजमान झालं आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ganesh chaturthi 2023 tharla tar mag fame amit bhanushali welcomes lord ganesh pps

First published on: 19-09-2023 at 10:08 IST
Next Story
मराठमोळी अभिनेत्री यंदा न्यूझीलंडमध्ये साजरा करतेय गणेशोत्सव; खास थीमचे फोटो शेअर करत म्हणाली, “सलग २ दिवस…”