Gashmeer Mahajani upcoming Show: गश्मीर महाजनी हा नेहमीच वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असतो. नुकताच तो ‘देऊळ बंद २’ मधून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. याबरोबरच, अभिनेता सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत असतो. त्याचे अनेक फोटो, सोशल मीडियावरील पोस्ट यांमुळे तो कायमच चर्चेत असतो. चाहते त्याच्या पोस्टवर कमेंट्स करत त्याचे कौतुक करताना दिसतात. याबरोबरच, अभिनेता सोशल मीडियावर प्रश्नोत्तरांच्या माध्यमांतूनही चाहत्यांच्या संपर्कात असतो. चाहते कायमच त्याला त्याच्या आगामी भूमिकांबद्दल, चित्रपट, वेब सीरिजबद्दल विचारत असतात.
गश्मीर महाजनी ‘या’ शोमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार
आता गश्मीर लवकरच एका शोमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तो गश्मीर कोणत्या शोमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे, त्याच्याबरोबर प्रमुख भूमिकेत कोण आहे, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. १०८ बेस हॉस्पिटल उरी या शोमधून गश्मीर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
काही दिवसांपूर्वी या शोची झलक पाहायला मिळाली आहे. गश्मीर यामध्ये डॉक्टरच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याच्याबरोबर लोकप्रिय अभिनेत्री एरिका फर्नांडिस दिसणार आहे. त्यांचे काही फोटोदेखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यांच्यातील केमिस्ट्री लक्ष वेधून घेत आहे. गश्मीरनेदेखील एरिकाबरोबर काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. एका फोटोत त्यांनी मजेशीर पोज दिली आहे. तर एका फोटोत ते डॉक्टरच्या वेशात दिसत आहेत. या फोटोवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत.
गश्मीरचा हा नवीन शो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा शो कलर्स टीव्ही आणि जिओ हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे.गश्मीरने आतापर्यंत विविध हिंदी मालिका, वेब सीरिज, मराठी सिनेमे यांमधून प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले आहे. आता त्याचा हा नवीन शो पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.
अभिनेत्रीने सुप्रिया पिळगांवकर यांच्याबरोबर केले आहे काम
एरिकादेखील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिच्या अनेक भूमिका गाजल्या आहेत. कुछ रंग प्यार के ऐसी भी मधील तिची डॉक्टर सोनाक्षी बोस ही भूमिका प्रचंड गाजली होती. या मालिकेत तिने सुप्रिया पिळगांवकर यांच्याबरोबर काम केले होते. तसेच, कसौटी जिंदगी की या मालिकेतील प्रेरणा शर्मा ही भूमिकाही गाजली होती. तसेच, तिने काही वेब सीरिजमध्येदेखील काम केले आहे. आता प्रेक्षक तिची नवीन भूमिका पाहण्यासाठी उत्सुक आहेत.
दरम्यान, आता गश्मीर महाजनी व एरिका फर्नांडिस यांचा नवीन शो कधी प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
