‘बिग बॉस १९’ चा विजेता गौरव खन्नाची पत्नी आकांक्षा चमोला मागील काही महिन्यांपासून चांगलीच चर्चेत आहे. आकांक्षाला एका प्रमोशन इव्हेंटमध्ये सह-कलाकारांबरोबरच्या डान्समुळे टीकेला सामोरं जावं लागलं होतं. आता पुन्हा एका वेगळ्या व्हिडीओमुळे तिला मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं जातंय. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून, अनेक युजर्सनी तिच्यावर टीका केली आहे. काही लोकांनी तर तिला ‘कुठे कसं वागावं याची हेदेखील कळत नाही’ असंही म्हटलं आहे.
आकांक्षा चमोलाने नुकतीच एका कार्यक्रमाला हजेरी लावली. तिथे ‘ओम शिवोहम’ हा संस्कृत मंत्र वाजत होता. उपस्थित सर्व लोक शांतपणे बसून तो मंत्र ऐकत होते, मात्र आकांक्षा त्याच वेळी विचित्र पद्धतीने दुसरीकडे बघून तोंड वेडेवाकडे करत होती. या गंभीर प्रसंगी तिचं असे वागणे लोकांना अजिबात आवडलं नाही. तिच्या अशा वागण्यामुळे लोकांनी तिला प्रचंड ट्रोल केलं आहे.
कमेंट सेक्शनमध्ये लोकांनी आपला राग व्यक्त करत आकांक्षाला खडेबोल सुनावले आहेत. एका युजरने लिहिलं, “हद्दच झाली, हिला कुठे कसं वागावं समजत नाही.” “डॉक्टर काय म्हणाले? ही कधीपर्यंत बरी होईल?” असं एका युजरने म्हटलं. तर एकाने तिच्या कपड्यांवरूनही सुनावलं. “धार्मिक कार्यक्रमात असे कपडे घालून कोण येतं? जरा सुद्धा नीट वागत नाही.”
पाहा व्हिडीओ
आकांक्षा चमोलाच्या ‘दिल धोखा और इच्छा’ या शोचा प्रीमियर १२ फेब्रुवारी २०२६ रोजी ‘शेमारूमी’वर झाला. या शोच्या लॉन्च इव्हेंटमध्ये तिने कुंवर अमर आणि अली हसन यांच्याबरोबर डान्स केला होता. यावरून झालेल्या टीकेला उत्तर देताना आकांक्षाने इन्फ्लुएंसर ‘जयति अनस्क्रिप्टेड’चा एक व्हिडीओ शेअर केला होता.
संबंधित इन्फ्लुएन्सरने म्हटलं होतं की गौरव खन्नाचा ‘बिग बॉस १९’ मधील विजय त्याची पत्नी आकांक्षासाठी समस्या का बनली आहे? आकांक्षाच्या प्रत्येक कृतीवर इतक्या बारकाईने का लक्ष ठेवलं जातंय? तिने काहीही केले तरी लोक सतत तिच्यावर लक्ष ठेवून असतात. जेव्हा गौरवने त्याच्या ‘अनुपमा’ शोचं प्रमोशन केलं होतं, तेव्हा त्याने सह-अभिनेत्रींबरोबर रोमँटिक सीन केले होते, पण तेव्हा कोणीही त्याच्या चारित्र्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले नाही. मात्र, आकांक्षा फक्त तिचं काम करतेय, तरी तिला ट्रोल केलं जातंय. “ती सुद्धा एक अभिनेत्रीच आहे ना, हे लोकांना का समजत नाही?” असा सवाल तिने केला होता.
आवेज दरबारबरोबरच्या व्हिडीओमुळे झाला होता वाद
‘बिग बॉस १९’ चा स्पर्धक आवेज दरबार याच्याबरोबर डान्स करतानाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता, तेव्हाही आकांक्षाला अशाच टीकेला सामोरं जावं लागलं होतं. त्यावेळी तर इंटरनेट युजर्सनी तिच्या वैवाहिक आयुष्यात समस्या सुरू असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं.
