‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमामुळे अभिनेता गौरव मोरे प्रसिद्धीच्या झोतात आला. गेली अनेक वर्षे तो प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करत आहे. गौरव पवई येथील फिल्टरपाड्याचा असल्याने त्याला ‘फिल्टरपाड्याचा बच्चन’ या नावाने देखील ओळखलं जातं. हास्यजत्रेमुळे गौरव मोरे घराघरांत पोहोचला. त्याचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत अभिनेत्याने ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून प्रेक्षकांचा निरोप घेतो असं जाहीर केलं होतं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सध्या गौरव मोरे ‘सोनी टीव्ही’वरील लोकप्रिय कॉमेडी शो ‘मॅडनेस मचाएंगे’मध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवत आहे. गेल्या काही दिवसांपासून या शोमध्ये जुही चावलापासून ते मल्लिका शेरावतपर्यंत अशा अनेक अभिनेत्रींनी हजेरी लावली होती. या सगळ्यांचं गौरवने त्याच्या कॉमेडीने भरभरून मनोरंजन केलं. जुही चावला तर गौरववर चांगलीच इम्प्रेस झाली होती. आता लवकरच हा मराठमोळा अभिनेता फराह खानला आपल्या अभिनयाची झलक दाखवणार आहे.

हेही वाचा : Video : गरोदर दीपिका पादुकोणला स्टेजवरून उतरण्यास मदत करायला धावले अमिताभ बच्चन अन् प्रभास, कोण जिंकलं? तुम्हीच पाहा

विनोदाचं अचूक टायमिंग साधत संपूर्ण महाराष्ट्रातील प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा लोकप्रिय अभिनेता म्हणून गौरव मोरेला ओळखलं जातं. गेल्या काही महिन्यात गौरवची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. आता मराठीशिवाय तो हिंदी कलाविश्वात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करत आहे. 

फराह खान येत्या शनिवार-रविवारी ‘मॅडनेस मचाएंगे’मध्ये विशेष पाहुणी म्हणून उपस्थिती लावणार आहे. यावेळी दिग्दर्शिका मंचावर येताच गौरवने तिला खळखळून हसवलं. अंगावर पावडर उडवून फिल्टरपाड्याच्या बच्चनने मंचावर एकच कल्ला केला. त्याला पाहून सर्वत्र एकच हशा पिकल्याचं या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.

हेही वाचा : Video : ‘देखा तेनु पहली पहली बार…”, नारकर जोडप्याचा रोमँटिक गाण्यावर जबरदस्त डान्स, अविनाश यांच्या एक्सप्रेशन्सने वेधलं लक्ष

दरम्यान, गौरव मोरेने हा प्रोमो त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. यावर अभिनेत्याला नेटकऱ्यांकडून संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्या आहेत. काही लोकांनी गौरवचं कौतुक केलंय. तर अनेकांनी “गौरव तू अशी स्वत:ची मजा का करून घेत आहेस” असा सवाल कमेंट सेक्शनमध्ये उपस्थित केला आहे. याउलट काही चाहत्यांनी गौरवला पुन्हा एकदा ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमात येण्याची विनंती केली आहे.

सध्या गौरव त्याच्या ‘अल्याड पल्याड’ सिनेमामुळे चांगलाच चर्चेत आहे. या हॉरर कॉमेडी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. याशिवाय गौरवच्या अभिनयाचं कौतुक देखील करण्यात येत आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gaurav more impress farah khan in hindi comedy show madness machayenge sva 00
First published on: 20-06-2024 at 09:39 IST