Premium

‘चेन्नई सुपर किंग्स’ने IPL जिंकल्याचा आनंद व्यक्त करत गौतमी देशपांडेने ‘मुंबई इंडियन्स’च्या चाहत्यांना केलं लक्ष्य, म्हणाली…

मराठमोळी अभिनेत्री गौतमी देशपांडे हिने एक स्टोरी शेअर केली आणि मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांना लक्ष्य करत चेन्नई जिंकल्याचा आनंद व्यक्त केला.

gautami story

कालचा आयपीएल २०२३च्या अंतिम फेरीचा सामना खूपच अटीतटीचा होता. शेवटच्या चेंडूवर चौकार मारून रवींद्र जडेजाने चेन्नई सुपर किंग्सला आयपीएल-२०२३ ची ट्रॉफी मिळवून दिली. चेन्नईने पाचवी ट्रॉफी जिंकत सर्व चाहत्यांची मनं जिंकली. आता यावर मराठमोळी अभिनेत्री गौतमी देशपांडे हिने एक स्टोरी शेअर केली आणि मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांना लक्ष्य करत चेन्नई जिंकल्याचा आनंद व्यक्त केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काल सर्वांच्याच नजरा आयपीएलच्या फायनलवर होत्या. पावसामुळे सामना लांबला तरीही अनेक जण रात्री उशिरापर्यंत सामना पाहत होती. आतापर्यंत मुंबई इंडियन्सने सर्वाधिक आयपीएलच्या ट्रॉफी जिंकल्या होत्या. तर आता चेन्नई सुपर किंग्सने देखील पाचवी आयपीएलची ट्रॉफी जिंकत मुंबई इंडियन्सशी बरोबरी केली आहे. गौतमी देशपांडे नेहमीच चेन्नई सुपर किंग्सला सपोर्ट करताना दिसते. त्यामुळे काल चेन्नई सुपर किंग्सने आयपीएलची ट्रॉफी जिंकल्याचा गौतमीला प्रचंड आनंद झाला आहे.

आणखी वाचा : Video: “मला त्रास देणं बंद कर…” वैतागलेल्या गौतमीला बहिणीचं भन्नाट उत्तर, म्हणाली…

मुंबई इंडियन्सने आतापर्यंत आयपीएलच्या पाच ट्रॉफी जिंकल्या आहेत. मुंबई इंडियन्सला सपोर्ट करणारे सर्व जण “आतापर्यंत आम्हीच सर्वाधिक ट्रॉफी जिंकल्या,” असं म्हणत होते. मात्र आता चेन्नई सुपर किंग्सने देखील आयपीएलची पाचवी ट्राॅफी जिंकत मुंबई इंडियन्सशी बरोबरी केली आहे. याच पार्श्वभूमीवर गौतमीने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक स्टोरी शेअर होती. या स्टोरीमध्ये महेंद्रसिंग धोनी रवींद्र जडेजाला उचलून घेताना दिसत आहे. ही स्टोरी शेअर करत तिने लिहिलं, “वी लव्ह यू…बाय द वे, कोणी सर्वाधिक ट्रॉफी जिंकण्याबद्दल काही बोललं का?” असं गौतमीने लिहीत मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांची मस्करी केली.

हेही वाचा : मिम शेअर करत गौतमी देशपांडे बहिणीला दिली गाढवाची उपमा, नंतर मृण्मयीने असं काही उत्तर दिलं की…

दरम्यान, चेन्नई सुपर किंग्स जिंकल्याबद्दल सध्या सर्वत्र आनंद व्यक्त केला जात आहे. अनेक कलाकारांनी देखील त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर आनंद व्यक्त करीत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. तर आयपीएलची ट्रॉफी जिंकल्यावर महेंद्रसिंग धोनी भावुक झालेला दिसला. या सामन्यादरम्यानचे त्याचे आता अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-05-2023 at 14:28 IST
Next Story
IPL Final : गौरव मोरेलाही आयपीएलची क्रेझ, लंडनमध्ये पाहिली CSK विरुद्ध GT फायनल, व्हिडीओ शेअर करत म्हणाला…