Gautami Kapoor on intimate scene of Ram Kapoor: मराठमोळी अभिनेत्री गौतमी कपूर ही अनेकदा तिच्या वक्तव्यांमुळे चर्चेत असते. आता तिने पती राम कपूरचा एका मालिकेत इंटिमेट सीन पाहिल्यानंतर काय वाटले, याबद्दल भावना व्यक्त केल्या.
‘बडे अच्छे लगते हैं’ ही मालिका छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ठरली. या मालिकेच्या सर्व सीझनला प्रेक्षकांची मोठी पसंती मिळाली.
‘बडे अच्छे लगते हैं’च्या पहिल्या सीझनमध्ये राम कपूर आणि साक्षी तन्वर हे कलाकार प्रमुख भूमिकेत दिसले होते. या कलाकारांना प्रेक्षकांचे मोठ्या प्रमाणात प्रेम मिळाले. ही मालिका प्रचंड गाजली होती. मात्र, यामध्ये दाखवलेल्या इंटिमेट सीनचीदेखील मोठी चर्चा झाली. आता राम कपूरची पत्नी गौतमी कपूरने या इंटिमेट सीनबद्दल समजल्यानंतर तिची प्रतिक्रिया काय होती, यावर वक्तव्य केले आहे.
“मला रात्रीच्या अडीच वाजता…”
गौतमी कपूरने नुकतीच सिद्धार्थ कननच्या पॉडकास्टला मुलाखत दिली. या मुलाखतीत ती म्हणाली, “मला रात्रीच्या अडीच वाजता फोन आला. मालिकेत इंटिमेट सीनचे शूटिंग केले आहे, असे मला सांगितले. जेव्हा मी ते ऐकले त्यावेळी माझी पहिली प्रतिक्रिया विचित्र होती. मी फोन बंद केला. जशी रात्र होऊ लागली तसा मी अधिक विचार करू लागले. मला जाणीव झाली की ते फक्त कलाकार आहेत, जे त्यांचे काम करत आहेत. मी उगाच वेगळा विचार करून रामला अडचणीत टाकत आहे.”
अभिनेत्री पुढे असे म्हणाली, “जेव्हा राम कपूर सकाळी शूटिंग संपवून घरी आले, त्यावेळी मी त्यांना कोणतेही प्रश्न विचारले नाहीत. मी त्यांना जाऊन मिठी मारली.” त्यादरम्यान राम कपूर अनेकदा ४८ तास शूटिंग करत असत, असेही अभिनेत्री म्हणाली.
काही दिवसांपूर्वी राम कपूरनेदेखील यावर वक्तव्य केले होते. तो म्हणाला होता की, तो सीन स्वत: एकता कपूरने लिहिला होता. मी त्या सीनबद्दल प्रश्न विचारला होता, तरीही तो सीन पुढे पाठवला होता.
दरम्यान, राम कपूर आणि साक्षी तन्वर यांची प्रमुख भूमिका असलेली ही मालिका २०११ ते २०१४ मध्ये भेटीला आली होती.
