Gautami Patil Mother Birthday Video : गौतमी पाटील ही प्रसिद्ध नृत्यांगना, स्टेज परफॉर्मर आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर म्हणून ओळखली जाते. तिच्या कार्यक्रमांना चाहते तुफान गर्दी करतात. “सबसे कातिल गौतमी पाटील” असं तिच्याविषयी बोललं जातं. गेल्या काही वर्षात गौतमी विविध म्युझिक अल्बम आणि टीव्ही मालिकांमध्येही पाहुणी कलाकार म्हणून झळकली आहे. याशिवाय गौतमी सोशल मीडियावर सुद्धा सक्रिय असते. तिने शेअर केलेल्या व्हिडीओला मिलियन व्ह्यूज मिळतात. आता गौतमीने शेअर केलेला असाच एक व्हिडीओ सर्वत्र चर्चेत आला आहे. कारण, यामध्ये प्रेक्षकांना गौतमीसह तिची आई देखील पाहायला मिळतेय.

गौतमी पाटीलचं आपल्या आईवर जीवापाड प्रेम आहे. अनेक मुलाखतींमध्ये तिने आईबद्दल सांगितलं आहे. नुकताच गौतमीने घरच्या घरी आपल्या लाडक्या आईचा वाढदिवस साजरा केला.

वाढदिवसानिमित्त गौतमीने आपल्या आईला खास मोबाइल फोन भेट म्हणून दिला आहे. लेकीने दिलेली ही भेटवस्तू पाहून गौतमीची आई भावुक झाल्याचं पाहायला मिळालं. यानंतर या दोघींनी मिळून केक कापला…यावर ‘मातोश्री’ असं नाव लिहिलं आहे. लेकीने एवढं मोठं गिफ्ट दिलं हे पाहून गौतमीच्या आईने तिला प्रेमाने जवळ सुद्धा घेतलं.

Award Banner

मायलेकीचा हा गोड व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून…त्यांच्या या गोड नात्याला कुणाचीही नजर नको लागूदेत, असं तिचे चाहते कमेंट्समध्ये म्हणत आहेत.

गौतमी आणि तिची आई दिसायला अगदी सारख्याच आहेत आणि या दोघींमध्ये खूपच सुंदर बॉण्डिंग आहे. काही दिवसांपूर्वी गौतमीला एका पॉडकास्टमध्ये, “तुझ्या आयुष्यातील सगळ्यात जवळची व्यक्ती कोण?” असा प्रश्न विचारण्यात आला होता. तेव्हा तिने “आई” असं उत्तर दिलं होतं. याशिवाय, “कशाची भीती वाटते?” असा प्रश्न विचारल्यावर सुद्धा गौतमीने “आईपासून लांब होण्याची भीती वाटते” असं उत्तर दिलं होतं.

दरम्यान, गौतमीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर, नुकतीच ती ‘बिग बॉस मराठी’च्या दुसऱ्या पर्वाचा विजेता शिव ठाकरेसह “मासोळी सोन्यावाणी” या म्युझिक व्हिडीओमध्ये झळकली.