Gayatri Datar shares glimpse New Home:  अभिनेत्री गायत्री दातार सध्या तिच्या नवीन घरामुळे चर्चेत आहे. तिने गोरेगावमध्ये नवीन घर घेतले आहे. तिने घराचा व्हिडीओ तिच्या युट्यूब चॅनेलवर शेअर केला आहे. तिच्या घराचे इंटिरिअर, तसेच सजावट या सगळ्या गोष्टींची चर्चा सुरू आहे. या सगळ्यात गायत्रीच्या घराच्या नावाची पाटीने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

गायत्री दातारच्या घराची नेमप्लेट आहे खूपच खास

आता गायत्रीच्या घराच्या पाटीवर काय नाव आहे, ते नाव देण्यामागे काय विचार होता याबद्दल जाणून घेऊयात. गायत्रीने नुकताच राजश्री मराठीशी संवाद साधला. राजश्री मराठीच्या व्हिडीओमध्येदेखील गायत्रीच्या घराची झलक पाहायला मिळते.

गायत्रीच्या घराच्या नावाच्या पाटीवर एस (S) आणि जी (G) ही अक्षरे लिहिली आहेत. त्यावर सुंदर डिझाईन आहे. नावाच्या पाटीबद्दल ती म्हणाली, “मी आणि श्रीकांत(गायत्रीचा नवरा)गुगलवर बघत होतो की काय चांगलं दिसेल. काय ठेवायचं नाव, काहीतरी युनिक पाहिजे, असा विचार सुरू होता. तर मग एस आणि जी ही आद्याक्षरे द्यायची ठरवली. कारण, एस वरुन आईचं सविता आणि जीवरुन माझं गायत्री हे नाव आहे. तसेच, एसवरुन श्रीकांतचंही नाव आहे. त्यामुळे आई व श्रीकांतच्या नावावरुन एस आणि माझ्या नावावरुन जी म्हणून आम्ही घराच्या नावाच्या पाटीवर ती अक्षरे दिली आहेत.”

गायत्रीच्या घराची नेमप्लेट (फोटो सौजन्य: युट्यूब

गायत्रीने तिचे घर खूप सुंदररित्या सजवले आहे. हॉल, डायनिंग एरिआ सगळेच छान सजवले असल्याचे पाहायला मिळते.

घराचा हॉल (फोटो सौजन्य: युट्यूब)

घर घेताना आर्थिक गोष्टी कशा सांभाळल्या याबद्दल गायत्री म्हणाली, “जेव्हापासून मी कमवायला लागले, तेव्बापासून मी थोडी थोडी बचत करत होते. तर, ती बचत मोठ्या प्रमाणात माझ्याकडे जमली. याबरोबरच, आईनेही मला मदत केली. मदत तिने याासाठी केली केली माझ्याकडचे सगळेच पैसे संपावेत, असं तिला वाटत नव्हतं. तिचं असं म्हणणं होतं की मी तुला आता पैसे देते, तुला हवं तर परत दे. नाहीतर माझ्याकडून हे भेट समज. आई-बाबांची परिस्थिती चांगली असल्यामुळे मलाही त्यांच्याकडून पैसे घेताना मनावर ताण नव्हता.” ती असेही म्हणाली स्वत:चं घर असणं ही एक मुलगी म्हणून सुरक्षिततेची गोष्ट वाटते.

गायत्रीने घरात सुंदर सटावट केली आहे (फोटो सौजन्य: युट्यूब)
डायनिंग एरिया (फोटो सौजन्य: युट्यूब)

दरम्यान, गायत्रीने याच मुलाखतीत हेही सांगितले की तिने हे घर डिसेंबर २०२५ मध्येच घेतले आहे.