Ashwini Mahangade shares video of Bagad Yatra: लोकप्रिय अभिनेत्री अश्विनी महांगडे ही विविध माध्यमांतून चाहत्यांच्या भेटीला येत असते. विविध मालिका, भूमिका तसेच चित्रपट या माध्यमांत ती काम करते.
अश्विनी महांगडे ‘अस्मिता’, ‘स्वराज्यरक्षक संभाजी’, ‘आई कुठे काय करते’ या मालिकांमधून घराघरांत पोहोचली. तिच्या मालिकांमधील भूमिका चांगल्याच गाजल्या.
सध्या अभिनेत्री ‘घरोघरी मातीच्या चुली’ या मालिकेत काम करत असल्याचे पाहायला मिळत आहे. तिने माया ही भूमिका साकारली आहे. भाऊ मकरंदचा बदला घेण्यासाठी माया जानकीच्या आयुष्यात आली. जानकीबरोबर ती चांगली असल्याचे नाटक करत असल्याचे पाहायला मिळाले. तीच मास्कमॅन म्हणून आतापर्यंत सर्वांना फसवत होती. अश्विनीने या मालिकेत नकारात्मक भूमिका साकारली आहे.
बगाड यात्रेचा व्हिडीओ तुम्ही पाहिलात का?
अभिनयाबरोबरच अभिनेत्री सोशल मीडियाच्या माध्यमातूनही प्रेक्षकांच्या भेटीला येते. सोशल मीडियावर ती विविध फोटो, व्हिडीओ शेअर करत असते. तसेच, तिला आलेले अनुभवही ती सांगते. तिला आवडलेल्या गोष्टींबद्दल ती भरभरून बोलत असते.
आता अभिनेत्रीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये बगाड यात्रेचे काही खास क्षण दाखवले आहेत. व्हिडीओच्या सुरुवातीला अभिनेत्री म्हणते, “तर ही परंपरा आहे. गेली अनेक वर्षे म्हणजे आमच्या अनेक पिढ्या ज्या इथे वसलेल्या आहेत, त्या ही यात्रा खूप खूप प्रेमाने आणि भक्तिभावाने साजरी करत असतात.” ती मंदिर परिसरात असल्याचे पाहायला मिळत आहे. श्री कालभैरवनाथ मंदिर, जागृत देवस्थान असे लिहिले आहे. तिने सुंदर साडी नेसली आहे.
व्हिडीओमध्ये पुढे यात्रेतील काही खास क्षण पाहायला मिळतात. पारंपरिक वेशभूषेतील लोक, फुलांची, गुलालाची उधळण पाहायला मिळत आहे. बगाड यात्रेतील हे खास क्षण लक्ष वेधून घेत आहेत.
हा व्हिडीओ शेअर करताना, “महाराष्ट्रातील पहिली बगाड यात्रा”, असे लिहिले आहे. अभिनेत्रीने शेअर केलेल्या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत.
नेटकरी काय म्हणाले?
“नाथसाहेबांच्या नावानं चांगभलं” “महाराष्ट्रातली पहिली बगाड यात्रा”, “श्री कालभैरवनाथ”, अशा कमेंट केल्या आहेत; तर अनेकांनी हात जोडल्याच्या इमोजी शेअर केल्या आहेत, तर अनेकांनी हार्ट इमोजी शेअर केल्या आहेत.
दरम्यान, अश्विनी आता आगामी काळत कोणत्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

