अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना यांच्या ‘पुष्पा २’ चित्रपटाची सध्या सर्वत्र क्रेझ निर्माण झाली आहे. या चित्रपटाचा पहिला भाग ‘पुष्पा : द राइज’ हा २०२१ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली होती. त्यामुळे प्रेक्षकांना आता प्रदर्शित होणाऱ्या दुसऱ्या भागाकडून देखील प्रचंड अपेक्षा आहेत. सुरुवातीला हा चित्रपट ऑगस्टमध्ये प्रदर्शित होणार होता. परंतु, काही कारणास्तव याच्या प्रदर्शनाची तारीख बदलण्यात आली आहे. आता ‘पुष्पा २’ डिसेंबरमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

‘पुष्पा २’मधील ‘सूसेकी’ गाणं या मे महिन्याच्या अखेरीस प्रदर्शित करण्यात आलं होतं. हे गाणं सध्या सर्वत्र ट्रेंड होत आहे. सामान्य लोकांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत सगळेच या गाण्यावर रील व्हिडीओ बनवून डान्स करत आहेत. ऐश्वर्या व अविनाश नारकर, अर्जुन – सावी, ‘पारू’ मालिकेतील कलाकार, रमा – राघव, राया – मंजिरी असे सगळेच मराठी मालिकांमधील कलाकार या ‘सूसेकी’ गाण्यावर थिरकले असल्याचं गेल्या काही दिवसांत पाहायला मिळालं. परंतु, आता गाण्यावर ‘घरोघरी मातीच्या चुली’ मालिकेतील जाऊबाईंच्या जोडीने केलेल्या व्हिडीओने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

हेही वाचा : मुग्धाने केलं कीर्तन तर, तबल्याच्या साथीला प्रथमेश! लग्नाला ६ महिने पूर्ण होताच गायिकेने शेअर केला खास व्हिडीओ

‘घरोघरी मातीच्या चुली’ मालिकेत रेश्मा शिंदेने ‘जानकी’, तर प्रतीक्षा मुणगेकरने ‘ऐश्वर्या’ हे पात्र साकारलं आहे. जानकी आणि ऐश्वर्या मालिकेत एकमेकींच्या जाऊबाई आहेत. या ऑनस्क्रीन जाऊबाईंच्या जोडीने भन्नाट रील व्हिडीओ शेअर केला आहे. ‘पुष्पा २’च्या ‘सूसेकी’ गाण्यावर या अभिनेत्री थिरकल्या आहेत. रेश्माने या व्हिडीओला “देवरानी वर्सेस जेठानी” असं कॅप्शन दिलं आहे.

हेही वाचा : Video: ‘पुष्पा २’मधील ‘सूसेकी’ गाण्यावर पुन्हा एकदा थिरकली सोनाली कुलकर्णी, साथ दिली तीन सुप्रसिद्ध नृत्यदिग्दर्शकांनी

जानकी आणि ऐश्वर्याच्या या व्हिडीओवर कलाकारांनी भन्नाट कमेंट्स केल्या आहेत. अमित भानुशालीने यावर “मस्तच! दोघींनी उत्तम डान्स केला अशी कमेंट केली आहे. तर अन्य काही नेटकऱ्यांनी या मजेशीर व्हिडीओवर हसण्याचे इमोजी जोडले आहेत.

हेही वाचा : शत्रुघ्न सिन्हा यांच्या बंगल्यावर आकर्षक विद्युत रोषणाई; सोनाक्षीच्या हातावर सजली झहीर इक्बालच्या नावाची मेहंदी

दरम्यान, ‘घरोघरी मातीच्या चुली’ या मालिकेबद्दल सांगायचं झालं तर, यामध्ये रेश्मा शिंदे आणि भक्ती देसाईसह सुमीत पुसावळे, सविता प्रभुणे, प्रमोद पवार, उदय नेने, आशुतोष पत्की, प्रतिक्षा मुणगेकर, नयना आपटे व बालकलाकार आरोही सांबरे हे कलाकार महत्त्वाच्या भूमिका साकारत आहेत.