Gharoghari Matichya Chuli fame actors Dance Video: कलाकार जसे मालिका, नाटक, चित्रपट या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येतात, तसेच ते सोशल मीडियाच्या माध्यमातूनही भेटीला येतात.

सोशल मीडियावर डान्स, गाणी, विनोदी रील्स अशा विविध गोष्टी करत ते चाहत्यांचे मनोरंजन करतात. तसेच बऱ्याचदा ते ज्या प्रोजेक्टमध्ये काम करत असतात, त्या ठिकाणी शूटिंगदरम्यान काय गमतीजमती घडतात, काही सीन्सचे कसे शूटिंग केले जाते; याबरोबरच त्यांच्या कामाबद्दलही ते सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगतात.

‘घरोघरी मातीच्या चुली’ ही स्टार प्रवाह वाहिनीवर प्रदर्शित होणारी मालिका आहे. या मालिकेतील कलाकार सोशल मीडियावर सक्रिय असतात. विनोदी रील्समधून चाहत्यांना खळखळून हसवतात, तर डान्सचे व्हिडीओ शेअर करत मनोरंजन करतात. चाहतेदेखील त्यांच्या सोशल मीडियावरील व्हिडीओंना मोठ्या प्रमाणात पसंती देतात.

Award Banner

आता मालिकेतील सारंग आणि ऐश्वर्या यांनी एका गाण्यावर डान्स केला आहे. ‘घरोघरी मातीच्या चुली’ या मालिकेत ऐश्वर्या ही भूमिका प्रतीक्षा मुणगेकरने साकारली आहे, तर सारंग ही भूमिका उदय नेने या अभिनेत्याने साकारली आहे.

ऐश्वर्या व सारंगचा डान्स व्हिडीओ पाहिलात का?

‘तुझ्या रूपानं वेड लावलं’ या गाण्यावर दोघेही थिरकताना दिसत आहेत. त्यांच्या डान्स स्टेप्स आणि हावभाव लक्ष वेधून घेत आहेत. या व्हिडीओमध्ये उदयने कुर्ता परिधान केला आहे, तर प्रतीक्षाने साडी नेसली आहे.

हा व्हिडीओ शेअर करत प्रतीक्षाने लिहिले, “तुम्हाला कोणाच्या प्रेमाने वेड लावलंय का?” अभिनेत्रीच्या या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत.

नेटकऱ्यांनी केला कौतुकाचा वर्षाव

एकाने लिहिले, “तुमच्या मालिकेने वेड लावलं”, दुसऱ्या एकाने लिहिले, “इतकी चांगली झाली आणि सुधारली म्हणून ऐश्वर्यानेच वेड लावले”, एकाने लिहिले, “कडक”, दुसऱ्याने लिहिले, “खूप छान”, अशा अनेक कमेंट्स पाहायला मिळत आहेत; तर सहकलाकार सुमित पुसावळेने कौतुक करत, “अहा, कडक, तुम्ही दोघांनी उत्तम डान्स केला”, असे लिहिले आहे; तर अनेकांनी हार्ट इमोजी शेअर केल्या आहेत.

मालिकेत दाखविल्याप्रमाणे ऐश्वर्याने सुरुवातीपासूनच सारंग व त्याच्या परिवाराला त्रास दिला. जानकीला कुटुंबापासून दूर करण्यासाठी अनेक प्रयत्न केले, यामध्ये स्वत:चेही अनेकदा नुकसान केले. मात्र, आता ऐश्वर्याच्या स्वभावात बदल झाल्याचे दिसत आहे, त्यामुळे तिच्यातील हा बदल ताप्तुरता आहे की खरंच बदलली आहे असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. दरम्यान, आता मालिकेत पुढे काय होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.