Sumit Pusawale on Anushri Mane: बिग बॉस मराठीचे सहावे पर्व नुकतेच संपले. या सीझनमध्ये सुरुवातीला १७ स्पर्धक सहभागी झाले होते. त्यानंतर चार वाईल्ड कार्ड स्पर्धकांची एन्ट्री झाली होती.
राकेश बापट, तन्वी कोलते, अनुश्री माने, विशाल कोटियन व दीपाली सय्यद हे टॉप ५ मध्ये होते. तर राकेश बापट आणि तन्वी कोलते हे दोन स्पर्धक टॉप २ मध्ये होते. त्या दोघांपैकी तन्वी कोलते ही बिग बॉसच्या सहाव्या पर्वाची विजेती ठरली.
राकेश बापटला दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. तर, विशाल कोटियन तिसऱ्या क्रमांकावर होता. अनुश्री माने चौथ्या क्रमांकावर घराबाहेर पडली आणि पाचव्या क्रमांकावर दीपाली सय्यद होती.
आता अंतिम सोहळा पार पडल्यानंतर चाहत्यांसह अनेक कलाकारांनी स्पर्धकांवर कौतुकाचा आणि शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. आता या सगळ्यात सुमित पुसावळेची एक पोस्ट लक्ष वेधून घेत आहे.
“तू खूप…”
अभिनेता सुमित पुसावळेने इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली. त्यामध्ये अनुश्री मानेचा एक फोटो शेअर केला आहे. त्याने अनुश्रीला टॅग करत लिहिले की, माझ्यासाठी व माझ्या पत्नीसाठी तू चॅम्पियन आहेस. तू खूप छान खेळलीस.” त्याने असेही लिहिले, “ज्या पद्धतीनं खेळली आहेस, तुला शेरनी हे टायटल शोभतंय.”

अनुश्री ही सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर म्हणून लोकप्रिय आहे. तिचा चाहतावर्ग मोठा आहे. तिचे डान्सचे व्हिडीओ बऱ्याचदा व्हायरल होतात. तिच्या रील्सवर प्रेक्षक कमेंट्स करीत कौतुकाचा वर्षाव करताना दिसतात. तिच्या फॉलोअर्सची संख्याही मोठी आहे.
याआधी ती झी मराठी वाहिनीवरील ‘चल भावा सिटीत’ या रिअॅलिटी शोमध्ये सहभागी झाली होती. त्यानंतर ती बिग बॉस मराठीच्या सहाव्या पर्वात स्पर्धक म्हणून सहभागी झाली. त्यानंतर तिचा खेळ पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक होते.
सुरुवातीला अनुश्री टोळी या ग्रुपचा भाग होती. त्यामध्ये विशाल, राधा, तन्वी, रुचिता, रोशन व अनुश्री होते. त्यानंतर टोळीमधून तन्वी बाहेर पडली. त्यानंतर अनुश्रीनेदेखील ती टोळीचा भाग नसल्याचे सांगितले. ती कोणत्याही ग्रुपचा भाग नाही, असे सांगितले.
अनुश्रीने वेळोवेळी तिची मते स्पष्टपणे मांडली. जेव्हा गरज लागली तेव्हा इतरांची मदत घेतल्याचे पाहायला मिळाले. टास्कमध्येही ती उत्तम खेळत असल्याचे दिसले. विशाल कोटियन आणि सागर कारंडे यांच्याबरोबर तिचे उत्तम बॉण्डिंग झाल्याचे पाहायला मिळाले. तिचा बिग बॉसमधील खेळ अनेकांना आवडला. सागर कारंडेसह अनेकांनी ती जिंकावी, अशी इच्छा व्यक्त केली होती.
दरम्यान, सुमित पुसावळेबद्दल बोलायचे, तर सध्या तो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेत काम करत आहे.
