मनोरंजनसृष्टीत सध्या लगीनघाई सुरु असल्याचे दिसून येत आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये अनेक कलाकारांनी लग्नगाठ बांधत नवीन आयुष्याला सुरुवात केली. काल १४ फेब्रवारीला ‘व्हॅलेंटाईन डे’चे औचित्य साधत अभिनेता प्रथमेश परब व मराठी दिग्दर्शक समीर विद्वांस यांनी साखरपुडा करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली. त्यांच्यापाठोपाठ आता आणखी एका प्रसिद्ध अभिनेत्याने साखरपुडा उरकला आहे.

हिंदीतील लोकप्रिय मालिका ‘गूम है किसी के प्यार में’ फेम अभिनेता हर्षद अरोराचा साखरपुडा सोहळा नुकताच पार पडला. व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी हर्षदने प्रेयसी मुस्कान राजपूतबरोबर साखरपुडा केला. अभिनेत्याने सोशल मीडियाद्वारे खास फोटो शेअर करत ही बातमी दिली आहे. हर्षद व मुस्कानच्या साखपुड्याचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत.

हर्षदने इन्स्टाग्रामवर त्याच्या साखरपुड्याचा एक फोटो शेअर केला आहे, या फोटोमध्ये तो मुस्कानच्या गळ्यात पेंडंट घालताना दिसत आहे. हा फोटो शेअर करत त्याने लिहिले “आमच्या आयुष्यात आम्ही एकत्र पाऊल ताकत आहोत” हर्षदची ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे. अनेक चाहत्यांनी या पोस्टवर कमेंट करत शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

हेही वाचा- Video: ‘शिवा’ मालिकेतील ‘तो’ सीन व्हायरल, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “कार्टून दाखवताय का लहान मुलांना…”

कोण आहेत हर्षदची होणारी पत्नी

हर्षदची होणारी पत्नी मुस्कानही प्रसिद्ध अभिनेत्री आहे. आत्तापर्यंत तिने अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. छोट्या पडद्यावरील लोकप्रिय ‘नागिन’ या मालिकेमधून ती घराघरांत पोहचली. या मालिकेत तिने विदुषीची भूमिका साकारली होती.