मराठीसह बॉलीवूड कलाविश्वात आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणून गिरिजा ओकला ओळखलं जातं. काही महिन्यांपूर्वीच गिरिजा ‘नॅशनल क्रश’ म्हणून नावारुपाला आली. सोशल मीडियावर नेहमीच तिची चर्चा असते. बॉलीवूडच्या दिग्गज कलाकारांबरोबर सुद्धा तिने स्क्रीन शेअर केलेली आहे. गिरिजा शाहरुख खानबरोबर ‘जवान’ सिनेमात झळकली होती. ‘जवान’च्या निमित्ताने गिरिजाचा मुलगा कबीर सुद्धा शाहरुखला भेटला होता. आता किंग खानला भेटल्यावर कबीरची काय रिअ‍ॅक्शन काय होती? याबाबत तिने एका मुलाखतीत सांगितलं होतं.

गिरीजा ओक सांगते, “जेव्हा माझा मुलगा कबीर पहिल्यांदा शाहरुख खानला सेटवर भेटला तेव्हा होता, तेव्हा शाहरुख सिनेमातील टक्कलवाल्या लूकमध्ये होता. जसा शाहरुख त्याच्याकडे वळला कबीर काही सेकंदासाठी पाहतच बसला. त्याला कळलं नाही तो शाहरुख खान आहे. कारण टक्कलच्या लूकमध्ये तो फार वेगळा दिसत होता. पण जेव्हा चार-पाच सेकंदाने त्याला लक्षात आलं की, हा शाहरुख खान आहे. तेव्हा मात्र कबीर आश्चर्य चकीत झाला. हा क्षण माझ्याही कायम आठवणीत राहणार आहे.” असं अभिनेत्रीने राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत काही वर्षांपूर्वी सांगितलं होतं.

srk girija oak jawan
शाहरुख खानचा ‘जवान’मधील लूक

गिरिजा पुढे म्हणाली होती, “माझ्या शूटिंगचा पहिला दिवस पुण्यात होता आणि तिथे आम्ही मेट्रो स्ट्रेशनवरती शूट केलं. मोजक्याच गाड्या आत येऊ देत होते आणि मोठा तामझाम होता. पहिल्याच दिवशी आपण कोणत्या दर्जाच्या चित्रपटात काम करणार आहोत, याचा अनुभव आला. अगदी बाहेरपर्यंत सिक्युरिटी होती. जेव्हा आम्ही शूट करण्यासाठी मुंबईला परत आलो होतो तेव्हा खऱ्या अर्थाने पहिला दिवस मी शाहरुख खानला भेटले. आम्ही पहिल्यांदा सेटवर गेल्यावर आम्हा सहा जणींना त्याने मिठी मारली आणि म्हणाला, ‘धन्यवाद. तुम्ही या चित्रपटाचा एक भाग आहात.’ तो क्षण मी विसरू शकत नाही.”

srk girija oak jawan
‘जवान’ सिनेमातील अभिनेत्री व शाहरुख खान यांचा फोटो

“शाहरुख प्रत्येकीचे आभार मानत होता. हा क्षण खूप खास होता. आम्ही या चित्रपटासाठी खूप शूटिंग केलं, जवळपास आम्ही ४५ दिवस चेन्नईत होतो. आम्ही सगळ्या पोरी एकत्र राहत होतो. त्यामुळे आम्ही एक वेगळा दंगा केला. अशा प्रकारच्या खूप आठवणी या चित्रपटादरम्यानच्या आहेत.” असं गिरिजाने सांगितलं होतं.