अभिनेता गोविंदाच्या एका भाचीचं लग्न झालं आहे. अभिनेत्री आरती सिंहने २५ एप्रिल रोजी दीपक चौहानशी मुंबईत लग्न केलं. तिच्या लग्नाला गोविंदा व टीव्ही इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. तिच्या लग्नात बिपाशा बासू, करण ग्रोव्हरही हजर होते. गोविंदाच्या एका भाचीच्या लग्नानंतर आता त्याची दुसरी भाची चर्चेत आली आहे. त्याची ही भाची लोकप्रिय अभिनेत्री असून ती धर्मांतराच्या मुद्द्यावरून चर्चेत आहे.

रागिनी खन्ना ही लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री आहे, ती बऱ्याच दिवसांपासून टीव्ही जगतापासून दूर आहे. तिने ‘ससुराल गेंदा फूल’, ‘भास्कर भारती’ सारख्या हिट मालिकांमध्ये काम केलं आहे. पण सध्या रागिनी तिच्या एका पोस्टमुळे चर्चेत आहे. तिच्या एका पोस्टनुसार तिने धर्मांतर करून ख्रिश्चन धर्म स्वीकारला आहे. याबाबत रागिनीला विचारण्यात आलं, त्यावर तिने काय उत्तर दिलं ते जाणून घेऊयात.

गौहर खानच्या एक्स बॉयफ्रेंडशी लग्न करतेय ‘ही’ अभिनेत्री? १३ वर्षांनी मोठ्या अभिनेत्यासह साखरपुड्याच्या चर्चांवर म्हणाली…

धर्मांतराच्या पोस्टबद्दल रागिनी म्हणाली…

‘दैनिक भास्कर’ला दिलेल्या मुलाखतीत रागिनी म्हणाली, “एक कलाकार म्हणून आम्ही अधिक खबरदार राहण्याची गरज आहे. हाच धडा मला या घटनेतून मिळाला आहे. खरं तर गेल्या काही महिन्यांपासून मी माझ्या चाहत्यांच्या पोस्ट पुन्हा पोस्ट करत आहे. आज मी जे काही आहे ते त्यांच्यामुळेच आहे, असा माझा विश्वास आहे. मी माझ्या सोशल मीडियावर त्यांची पोस्ट पुन्हा शेअर करून त्यांचे आभार मानते, पण अशाच एका पोस्टवरून इतका मोठा गोंधळ होईल, असं मला कधीच वाटलं नव्हतं. त्या पोस्टमुळे माझ्यावरच प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले.”

धर्मेंद्र यांच्यासोबत ४४ वर्षांचा संसार, पण कधीच सासरी गेल्या नाहीत हेमा मालिनी; जाणून घ्या कारण

मी तक्रार केली आहे – रागिनी खन्ना

रागिनी पुढे म्हणाली, “एका चाहत्याने एक बनावट पोस्ट केली, ज्यामध्ये मी ख्रिश्चन धर्म स्वीकारताना दिसत आहे. त्याने मला त्या पोस्टमध्ये टॅग केलं आणि मला कोलॅबरेशनसाठी ती पोस्ट पाठवली. मी चुकून ती पोस्ट अॅक्सेप्ट केली आणि त्याने ती फेक पोस्ट शेअर केली, ज्यात मी धर्मांतराबद्दल बोलतेय असं दिसतंय. पण ती पोस्ट पूर्णपणे खोटी आहे, मी त्याबद्दल तक्रार केली आहे. माझे लाखो चाहते आहेत, जर त्यापैकी कोणी असं चुकीचं, मूर्खपणाचं काम केले तर मी माझ्या संपूर्ण फॅन क्लबला दोष देऊ शकत नाही, कारण मी माझ्या चाहत्यांचा आदर करते.”

Video: मामा-भाच्याचं वैर, पण भाचीच्या लग्नाला पोहोचला गोविंदा; आरती सिंहबद्दल म्हणाला…

मी धर्म बदललेला नाही – रागिनी खन्ना

रागिनी म्हणाली, “पण याचा अर्थ मी माझा धर्म बदललाय, असं नाही. माझ्यासाठी मानवता हाच सर्वात मोठा धर्म आहे आणि तो कायम राहील.” तर, झालं असं होतं की रागिणी खन्नाने काही काळापूर्वी तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरून एक पोस्ट शेअर केली होती. ज्यात तिने ख्रिश्चन धर्म स्वीकारल्याचं लिहिलं होतं. यानंतर तिने त्या धर्म बदलल्याच्या पोस्टबद्दल माफी मागितली आणि जुनी पोस्ट डिलीट केली.