Tanvi Thakkar Separation Post: ‘ चित्रपट, मालिका, नाटक, वेब सीरिज, शॉर्ट फिल्म, म्युझिक व्हिडीओ या माध्यमांतून प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन कलाकार अनेकदा त्यांच्या खासगी आयुष्यामुळेदेखील अनेकदा चर्चेत असतात. त्यांच्या आयुष्यातील काही आनंदाचे आणि काही कठीण प्रसंग ते वेळोवेळी चाहत्यांबरोबर शेअर करीत असतात. तसेच, सोशल मीडियाच्या माध्यमातूनही हे कलाकार चाहत्यांच्या संपर्कात असतात.
गुम हैं किसी के प्यार में ही मालिका स्टार प्लस या चॅनेलवर प्रदर्शित झाली होती. २०२० ला प्रदर्शित झालेल्या या मालिकेने जवळजवळ पाच वर्षे प्रेक्षकांचे मनोरंजन केले. ही मालिका प्रचंड गाजली होती. या मालिकेत अभिनेत्री तन्वी ठक्कर महत्त्वाच्या भूमिकेत दिसली होती. आता अभिनेत्री तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे.
“मी आणि आदित्यने वेगळे होण्याचा….”
अभिनेत्रीने सोशल मीडियावरील पोस्टवर पोस्ट शेअर करीत लिहिले, “काही महिन्यांपासून अनेक लोक माझ्या खासगी आयुष्याबद्दल प्रश्न विचारत होते. खूप विचार करून आणि एकमेकांच्या संमतीने मी आणि आदित्यने वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. आमच्या दोघांसाठीही हे खूप अवघड आहे. आम्ही एकमेकांचा आदर करतो. कुटुंबासाठी आम्ही हा निर्णय घेण्याचे ठरवले आहे.”
पुढे अभिनेत्रीने, “आदित्य व माझ्यात कोणतीही भांडणं नाहीत. फक्त आमच्याशी जोडलेल्या लोकांना आनंदात पाहण्याची आमची इच्छा आहे. मीडिया, इंडस्ट्री आणि मित्रांना माझी विनंती आहे की, मला वेळ द्या. मला कोणाच्याही प्रश्नांची उत्तरं द्यायची नाहीत. तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार”, असे लिहित पतीपासून वेगळे होत असल्याची घोषणा केली आहे. ही पोस्ट शेअर केल्यानंतर तिने कमेंट सेक्शन बंद केले आहे.
तन्वी आणि आदित्य ‘एक दुसरे सें करते हैं प्यार हम’च्या सेटवर एकमेकांच्या प्रेमात पडले. २०१३ मध्ये त्यांनी साखरपुडा केला. त्यानंतर २०२१ मध्ये त्यांनी कोर्ट मॅरेज केले. त्यांच्या लग्नाच्या दोन वर्षांनंतर २०२३ मध्ये त्यांना मुलगा झाला. त्याचे नाव क्रिश असे आहे.
दरम्यान, अभिनेत्री आगामी काळात तिच्या या निर्णयाबद्दल आणखी काही खुलासा करणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
