केळीचे खांब, फुलांनी सजला राणादा-पाठकबाईंच्या लग्नाचा मंडप, मेहंदी कार्यक्रमाची जोरदार तयारी सुरू | hardeek joshi akshaya deodhar wedding preparation actor share video on instagram see details | Loksatta

केळीचे खांब, फुलांनी सजला राणादा-पाठकबाईंच्या लग्नाचा मंडप, मेहंदी कार्यक्रमाची जोरदार तयारी सुरू

अक्षया देवधर व हार्दिक जोशीच्या लग्नाची जोरदार तयारी सुरू आहे. हार्दिकने यादरम्यानचा एक व्हिडीओ शेअर केला आहे.

केळीचे खांब, फुलांनी सजला राणादा-पाठकबाईंच्या लग्नाचा मंडप, मेहंदी कार्यक्रमाची जोरदार तयारी सुरू
अक्षया देवधर व हार्दिक जोशीच्या लग्नाची जोरदार तयारी सुरू आहे. हार्दिकने यादरम्यानचा एक व्हिडीओ शेअर केला आहे.

‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेमुळे हार्दिक जोशी व अक्षया देवधर ही जोडी नावारुपाला आली. राणादा व पाठकबाई या त्यांच्या पात्राने तर प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावलं. या दोघांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री तर चर्चेचा विषय ठरली. पण खऱ्या आयुष्यातही हार्दिक व अक्षया यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. लवकरच हे दोघं विवाहबंधनात अडकणार आहेत. आता या दोघांच्या लग्न विधींना सुरुवात झाली आहे.

आणखी वाचा – मुंडावळ्या बांधून नवरी बाई तयार, हार्दिक जोशी व अक्षया देवधरच्या लग्न विधींना सुरुवात, पाहा खास झलक

गेल्या काही दिवसांपासून हार्दिक व अक्षयाच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरु आहे. अक्षयाने इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे लग्नापूर्वीचे विधी सुरू झाले असल्याचं सांगितलं होतं. आता हार्दिक-अक्षयाच्या मेहंदीच्या कार्यक्रमाची जोरदार तयारी सुरु आहे.

हार्दिकने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये लग्नाचा मंडप तसेच मेहंदी कार्यक्रमासाठी केलेली सजावट दिसत आहे. केळीचे खांब, फुलांची सजावट केली असल्याचं या व्हिडीओमध्ये दिसत आहे.

आणखी वाचा – Bigg Boss 16 : “आता राडा होणार” पुण्याचा गोल्डमॅन सनी वाघचौरेला पाहून घरातील सदस्यही हैराण, अंगावरील सोनं पाहिल्यानंतर म्हणाले…

तसेच ‘वेडिंग वाला घर’ असं पोस्टरही तयार करण्यात आलं आहे. अक्षया व हार्दिकचा जवळचा मित्र व अभिनेता अमोल नाईक त्यांच्या मेहंदी कार्यक्रमाला पोहोचला आहे. त्यानेही त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे दोघांच्या मेहंदी कार्यक्रमाचे फोटो व व्हिडीओ शेअर केले आहेत. या दोघांच्या विवाहसोहळ्याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन ( Television ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-11-2022 at 12:49 IST
Next Story
सुंबूल तौकीर ऑन स्क्रीन पती फहमान खानसह बांधणार लग्नगाठ? ‘बिग बॉस’मध्ये खुलासा करत म्हणाली…