Video : मेहंदी रंगली गं...!! वधूचा फोटो ते सप्तपदी, अक्षया देवधरच्या सुरेख मेहंदीचा व्हिडीओ समोर | Hardeek Joshi And Akshaya Deodhar marriage mehndi video instagram viral nrp 97 | Loksatta

Video : मेहंदी रंगली गं…!! वधूचा फोटो ते सप्तपदी, अक्षया देवधरच्या सुरेख मेहंदीचा व्हिडीओ समोर

तिच्या हाता-पायावरील सुरेख मेहंदीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.

Video : मेहंदी रंगली गं…!! वधूचा फोटो ते सप्तपदी, अक्षया देवधरच्या सुरेख मेहंदीचा व्हिडीओ समोर
अक्षया देवधर मेहंदी

‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेला राणादा आणि पाठकबाई म्हणजेच अभिनेता हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर लग्नघटिका समीप आली आहे. सध्या त्या दोघांच्याही घरी लग्नापूर्वीचे विविध विधी सुरु झाल्याचे पाहायला मिळत आहे. नुकतंच हार्दिक जोशीच्या घरी हळदीचा सभारंभ पार पडला. तर दुसरीकडे अक्षयाच्या मेहंदीचा कार्यक्रम पार पडला. येत्या २ डिसेंबरला ते दोघेही लग्नबंधनात अडकणार आहेत. सध्या त्या दोघांच्याही घरी लगीनघाई सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. अक्षया देवधरने नुकतंच तिच्या मेहंदी सोहळ्याचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. तिच्या मेहंदीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.

अक्षया ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. नुकतंच तिने तिच्या मेहंदी सोहळ्याचे काही व्हिडीओ शेअर केले आहेत. या व्हिडीओनी चाहत्याचे लक्ष वेधून घेतले आहे. यातील एका व्हिडीओत अक्षयाचा मेहंदीपूर्वीचा लूक पाहायला मिळत आहे. तसेच तिने मेकअप करतानाचा व्हिडीओही शेअर केला आहे. यात ती फारच सुंदर दिसत आहे. तसेच तिने मेहंदीसाठी परिधान केलेल्या ड्रेसही फारच हटके आहे.

त्यानंतर तिने हातावर आणि पायावर अत्यंत सुंदर अशी मेहंदी काढतानाचा एक व्हिडीओही शेअर केला आहे. या व्हिडीओत चार जणी तिच्या हातावर सुरेख मेहंदी काढताना दिसत आहे. यावेळी तिने हातावर वधू, प्रपोज करतानाचे एक जोडपे आणि सप्तपदीही पाहायला मिळत आहे. यावर अक्षया आणि हार्दिक असेही लिहिण्यात आले आहे. तिच्या हाता-पायावरील सुरेख मेहंदीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. यावेळी ती फारच आनंदात असल्याचे पाहायला मिळत आहे.

तुझ्यात जीव रंगला’ मालिकेतील राणादा आणि पाठक बाईंच्या जोडीला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं. हार्दिक आणि अक्षया या जोडीला प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिलं. छोट्या पडद्यावर लोकप्रिय ठरलेल्या या जोडीने अक्षय्य तृतीयादिवशी साखरपुडा करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. याचे अनेक फोटो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. ते पाहिल्यानंतर अनेक चाहत्यांना सुखद धक्का बसला होता

हार्दिक आणि अक्षया येत्या २ डिसेंबरला लग्न करणार असल्याचं बोललं जात आहे. पुण्यामध्ये यांचा विवाहसोहळा पार पडणार असल्याची चर्चा आहे. या दोघांच्या विवाहसोहळ्यासाठी त्यांचे चाहतेही उत्सुक आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन ( Television ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-12-2022 at 09:04 IST
Next Story
Video : तेजस्विनी लोणारी घराबाहेर पडताच चक्क जमिनीवर बसून ढसाढसा रडू लागले किरण माने, प्रेक्षकही भडकले