scorecardresearch

“मालिका संपल्यानंतर पहिली…” राणादा-पाठकबाईंनी सांगितलं नेमकी कशी झाली लव्हस्टोरीची सुरुवात

एका मुलाखतीत अक्षया आणि हार्दिकने त्यांच्या लव्हस्टोरीची सुरुवात नेमकी कशी झाली हे सांगितलं आहे

“मालिका संपल्यानंतर पहिली…” राणादा-पाठकबाईंनी सांगितलं नेमकी कशी झाली लव्हस्टोरीची सुरुवात
अक्षया आणि हार्दिकने त्यांच्या लव्हस्टोरीची सुरुवात नेमकी कशी झाली हे सांगितलं आहे (फोटो सौजन्य- हार्दिक जोशी इन्स्टाग्राम)

अभिनेता हार्दिक जोशी आणि अक्षय देवधर २ डिसेंबरला लग्नाच्या बेडीत अडकले. पण त्यांच्या लग्नाची चर्चा मात्र अद्याप सुरूच आहे. या दोघांचा शाही विवाहसोहळा पुणे येथे पार पडला होता. त्यानंतर लग्नाचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले होते. अक्षया आणि हार्दिक यांनीही बरेच व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. ऑनस्क्रीन राणादा पाठकबाई ते खऱ्या आयुष्यातले नवरा-बायको असं त्यांचं लग्न बरंच गाजलं. पण आता लग्नानंतर दिलेल्या एका मुलाखतीत अक्षया आणि हार्दिकने त्यांच्या लव्हस्टोरीची सुरुवात नेमकी कशी झाली हे सांगितलं आहे.

अक्षया देवधर आणि हार्दिक जोशी यांनी नुकतीच ‘साम टीव्ही’ला विशेष मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी त्यांच्या लव्हस्टोरीपासून ते लग्नापर्यंतचा संपूर्ण प्रवास उलगडून सांगितला आणि दिलखुलास गप्पा मारल्या. याच मुलाखतीत त्यांनी त्यांच्या आगळ्या वेगळ्या लव्हस्टोरीबद्दल सांगितलं.

आणखी वाचा- लग्नानंतर काय बदललं? राणादा म्हणतो, “मी विसरून जातो, घरी बायको…”

अक्षया म्हणाली, “एकत्र काम करत असताना लोक आपल्याला चिडवत असतात, आपण नवराबायको म्हणून वावरत असतो. आपले मित्र मैत्रिणी चिडवत असतात. हे असं सगळं आमच्याबाबतीत सुरूच होतं. पण आम्ही खूप क्लिअर होतो. आम्ही प्रेमात पडलोय असं आम्हाला जाणवलंही नव्हतं. असं काही होईल असंही आम्हाला वाटलं नव्हतं. पण पहिली हूरहूर जाणवली ती मालिका संपल्यानंतर आणि ते मी उखाण्यात उल्लेख केलाय.”

आपल्या लव्हस्टोरीबद्दल हार्दिक म्हणाला, “मालिका संपल्यानंतर तिला जाणवलं. पण त्यानंतर मला कळलं की २०१७ मध्ये माझ्या आईने एकदा तिला विचारलं होतं. त्यानंतर आई मला म्हणाली एकदा बोलून बघ. पण मी तिला म्हणालो अगं नको तिचं आयुष्य चांगलं चाललंय तर उगाच कशाला. पण आईने एकदा माझ्यासाठी बोलून बघ असा आग्रह केला. मग मी तिला बोललो तर ती म्हणाली की, मी विचार करून सांगते.”

आणखी वाचा-“आम्ही रात्री ११ वाजता भेटलो अन्…” पाठकबाईंनी सांगितली लग्नातील उखाण्यामागची खरी गोष्ट

हार्दिक पुढे म्हणाला, “ती मला म्हणाली होती की मला वाटलं तर मी घरच्यांशी बोलेन. त्यावर मी तिला म्हणालो की बघ तुझ्या हिशोबाने कसं ते पण आपल्या मैत्रीला धक्का लागला नाही पाहिजे. नंतर काही दिवसांनी तिने सांगितलं की, तुला एकदा माझ्या घरच्यांशी बोलावं लागेल. तर मी म्हटलं ठीक आहे बोलतो. काही घाई नाही जेव्हा तू कामानिमित्त पुण्यात येशील तेव्हा घरी येऊन बोलून घेतो. मी तिच्या घरी गेलो आणि तिच्या घरच्यांना भेटलो. आम्हाला वाटलं की कदाचित नकार वैगरे येईल पण झालं त्याच्या उलट. थेट लग्नाच्या तारखाच आल्या. त्यांनी नातं स्वीकारलं.”

मराठीतील सर्व टेलीव्हिजन ( Television ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-01-2023 at 11:17 IST

संबंधित बातम्या