hardeek joshi kiss akshaya deodhar in wedding photo goes viral | Loksatta

…अन् राणादाने भर मांडवात पाठकबाईंना केलं किस; अक्षया-हार्दिकच्या लग्नसोहळ्यातील फोटो व्हायरल

Akshaya Deodhar-Hardeek Joshi Wedding : अक्षयाला किस करतानाचा हार्दिकचा फोटो व्हायरल

…अन् राणादाने भर मांडवात पाठकबाईंना केलं किस; अक्षया-हार्दिकच्या लग्नसोहळ्यातील फोटो व्हायरल
हार्दिक जोशी व अक्षया देवधरच्या लग्नसोहळ्यातील फोटो व्हायरल. (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Akshaya Deodhar – Hardeek Joshi Marriage: ‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेतून घराघरात पोहोचलेली लोकप्रिय जोडी हार्दिक जोशी-अक्षया देवधर आज(२ डिसेंबर) विवाहबंधनात अडकले. कुटुंबीय, मित्रपरिवार व नातेवाईंकांच्या उपस्थितीत सप्तपदी घेत राणादा-पाठकबाईंनी लग्नगाठ बांधली. त्यांच्या लग्नातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

अक्षया-हार्दिकचा शाही विवाहसोहळा पुण्यात पार पडला. राणादा-पाठकबाईंनी विवाहबंधनात अडकून नवीन आयुष्याला सुरुवात केली आहे. या खास क्षणी राणादाने भर मांडवात सगळ्यांसमोर पाठकबाईंना किस केलं. अक्षया-हार्दिकचा लग्नसोहळ्यातील हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

हेही वाचा>> राणादा-पाठकबाई अडकले विवाहबंधनात; अक्षया-हार्दिकच्या सप्तपदीचा व्हिडीओ समोर

हेही वाचा>> Video: ‘मॅचिंग नवरा…’ अक्षया-हार्दिकच्या संगीत सोहळ्यात ‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेतील कलाकारांचा भन्नाट डान्स, व्हिडीओ व्हायरल

पाहा व्हिडीओ –

लग्नासाठी अक्षयाने खास हातमागावर विणलेली लाल रंगाची नऊवारी पैठणी साडी नेसत पारंपरिक लूक केला होता. तर धोतरमध्ये हार्दिकही राजबिंडा दिसत होता. त्यांच्या विवाहसोहळ्यासाठी मराठी कलाविश्वातील अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. हार्दिक-अक्षयाच्या लग्नासाठी चाहतेही उत्सुक होते. आता राणादा-पाठकबाई विवाहबंधनात अडकल्यानंतर चाहत्यांकडूनही त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.  

हेही पाहा>>Photos: ‘#अहा लगीन’ राणादाच्या हातावर रंगली पाठकबाईंच्या नावाची मेहंदी; अक्षया देवधर व हार्दिक जोशीच्या मेहंदी सोहळ्यातील खास फोटो

गेल्या अनेक दिवसांपासून अक्षया देवधर व हार्दिक जोशीच्या लग्नाची जय्यत तयारी सुरू होती. मेहंदी, हळदी व संगीत सोहळ्यातील फोटोही प्रचंड व्हायरल झाले आहेत. आता त्यांच्या लग्न सोहळ्यातील फोटोंनी चाहत्याचं लक्ष वेधून घेतले आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन ( Television ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-12-2022 at 12:41 IST
Next Story
Video : नऊवारी साडी, मंगळसुत्र, नथ, जोडवी, हिरवा चुडा; नवरीबाईचा थाटच न्यारा, पाठकबाईंच्या राणाने नेसलं धोतर