scorecardresearch

“प्रेक्षकांमुळेच आमचं लग्न…”, अक्षयाबरोबर विवाहबद्ध झाल्यानंतर हार्दिकचा खुलासा

लग्नाच्या बेडीत अडकल्यानंतर हार्दिक-अक्षया त्यांचं वैवाहिक आयुष्य आनंदात घालवत आहेत.

“प्रेक्षकांमुळेच आमचं लग्न…”, अक्षयाबरोबर विवाहबद्ध झाल्यानंतर हार्दिकचा खुलासा
हार्दिक जोशी व अक्षया देवधरने २ डिसेंबरला विवाहबद्ध होत नवीन आयुष्याला सुरुवात केली.(फोटो: हार्दिक जोशी/ इन्स्टाग्राम)

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय हार्दिक जोशी व अक्षया देवधरने २ डिसेंबरला विवाहबद्ध होत नवीन आयुष्याला सुरुवात केली. कुटुंबीय व मित्र परिवाराच्या उपस्थितीत त्यांनी सप्तपदी घेतले. त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते.

लग्नाच्या बेडीत अडकल्यानंतर हार्दिक-अक्षया त्यांचं वैवाहिक आयुष्य आनंदात घालवत आहेत. नुकतंच हार्दिकने ‘इट्स मज्जा’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याला “या वर्षात कोणत्या व्यक्तीला थॅंक्स म्हणशील असा प्रश्न विचारण्यात आला”. यावर उत्तर देत हार्दिक म्हणाला, “मी प्रेक्षकांना धन्यवाद म्हणतो. ‘तुझ्यात जीव रंगला’नंतर सहा महिन्यांतच मी ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’ मालिकेत मुख्य भूमिका साकारली. ही मालिका प्रेक्षकांमुळेच मला मिळाली”.

हेही वाचा>> “संत तुकाराम महाराज माझ्याकडे २२ वेळा आले”- सुबोध भावे

हेही पाहा>> Photos: ‘पठाण’मुळे वादाच्या भोवऱ्यात अडकलेला शाहरुख खान इन्स्टाग्रामवर फक्त ‘या’ सहा जणांना करतो फॉलो

“मालिका संपल्यानंतर लगेच ‘हर हर महादेव’ चित्रपट मला मिळाला. मला वाटतं, हे प्रेक्षकांचे आशीर्वाद आहेत. त्यांचे आशीर्वाद होते, म्हणूनच माझं व अक्षयाचं लग्न झालं. आम्हाला वाटत होतं तुमचं लग्न होणार, असं प्रेक्षक येऊन आम्हाला सांगतात. माझ्या आईनेही हाच विचार केला होता. आणि तीही ‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेची चाहती होती. म्हणूनच प्रेक्षकांना मी धन्यवाद देतो. असेच आमच्या पाठीशी उभे राहा”, असेही पुढे हार्दिक म्हणाला.

हेही वाचा>> उर्फी जावेदला झाला आहे ‘हा’ गंभीर आजार; दुबईच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल

‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेतून घराघरात पोहोचलेली राणादा-पाठकबाईंची जोडी खऱ्या आयुष्यातही विवाहबंधनात अडकल्याने चाहतेही खूश आहेत. लवकरच हार्दिक ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन ( Television ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 20-12-2022 at 18:00 IST

संबंधित बातम्या