आज व्हॅलेंटाईन डे आहे. व्हॅलेंटाईन डे हा अनेकांसाठी खास असतो, आपल्या जवळच्या व्यक्तीबद्दल आपल्याला वाटणारं प्रेम व्यक्त करण्याचा हा दिवस म्हणून ओळखला जातो. कलाकार हा दिवस कसा सेलिब्रेट करणार याकडे सर्वांचेच लक्ष असतं. तर आता काही महिन्यांपूर्वीच लग्न बंधनात अडकलेले राणादा आणि पाठक बाई म्हणजेच हार्दिक-अक्षया हा दिवस कसा साजरा करणार हे हार्दिकने सांगितलं आहे.

लग्नानंतरचा हा त्यांचा पहिलाच व्हॅलेंटाईन डे आहे. त्यामुळे हा दिवस खास बनवण्याची हार्दिकची इच्छा आहे. आज तो अक्षयाला एक खास गिफ्ट ही देणार आहे. या आजच्या प्लॅनबद्दल त्याने नुकतंच भाष्य केलं. हार्दिक म्हणाला, “मझ्यासाठी व्हेलेंटाईन म्हणजे फक्त आपली प्रेयसी नसून माझं काम, माझे आई-बाबा, माझं कुटुंब आणि मित्र मंडळीही आहेत. म्हणून मी कामातून सुट्टी घेतली नाही. वेळात वेळ काढून मी माझ्या कोल्हापूरच्या मित्रमंडळींनाही भेटणार आहे.”

आणखी वाचा : Photos: लगीन घटिका समीप आली…हार्दिक जोशीने हातमागावर विणली अक्षयाची खास पैठणी

पुढे तो म्हणाला, “व्हेलेंटाईन डेचे माझे फार मोठे प्लॅन्स नाहीत. पण अक्षयला साडी खूप आवडते त्यामुळे आज मी तिला साड्यांच्या दुकानात घेऊन जाईन आणि तिला आवडेल ती साडी घेऊन देईन. तसंच शूटिंग संपल्यावर तिला कोल्हापुरात तिच्या आवडत्या ठिकाणी जेवायला घेऊन जाईन. बायको म्हणून तिला थोडं अधिक स्पेशल ट्रीट करेन. पण मला वाटतं फक्त व्हेलेंटाईन डे आहे म्हणूनच असं वागलं पाहिजे असं नाही. तर जेव्हा-जेव्हा आपल्याला वेळ मिळतो तेव्हा आपण आपल्या प्रियजनांसाठी नक्कीच काहीतरी खास करू शकतो.”

हेही वाचा : रिसेप्शन सिद्धार्थ-कियाराचं पण चर्चा आकाश व श्लोका अंबानीच्या नम्रपणाची, व्हायरल व्हिडीओवर होतोय कौतुकाचा वर्षाव

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान ‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेतून घराघरात पोहोचलेली लोकप्रिय जोडी हार्दिक जोशी-अक्षया देवधर २ डिसेंबर रोजी विवाह बंधनात अडकली. पारंपारिक पद्धतीने त्यांचा विवाह सोहळा संपन्न झाला. कुटुंबीय, मित्रपरिवार व नातेवाईंकांच्या उपस्थितीत सप्तपदी घेत राणादा-पाठकबाईंनी लग्नगाठ बांधली.