Harish Dudhade Weight Loss video: सन मराठीवरील ‘मी संसार माझा रेखिते’ ही मालिका लोकप्रिय ठरत आहे. या मालिकेत दीप्ती केतकर व हरीश दुधाडे प्रमुख भूमिकेत आहेत. या मालिकेतील हरीश दुधाडेची भूमिका त्याच्या इतर भूमिकांहून वेगळी असल्याचे पाहायला मिळत आहे.
हरीश दुधाडेने आतापर्यंत विविध भूमिका साकारत प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. याआधी त्याने ‘तू सौभाग्यवती हो’, ‘माझे मन तुझे झाले’, ‘नकळत सारे घडले’, ‘कारण गुन्ह्याला माफी नाही’, ‘आई बाबा रिटायर होत आहेत’, ‘तुमची मुलगी काय करते?’ अशा अनेक मालिकांत वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. याबरोबरच ‘इन्स्पेक्टर झेंडे’, ‘पावनखिंड’, ‘मनाचे श्लोक’, ‘फसक्लास दाभाडे’, ‘क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम’ अशा सिनेमांत महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.
हरिश दुधाडेचे जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन
आता मात्र अभिनेता त्याच्या कोणत्याही भूमिकेमुळे नाही तर त्याच्या एका व्हिडीओमुळे चर्चेत आला आहे. हरीशने सोशल मीडियावर त्याचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये सुरुवातीला त्याचे वजन जास्त असलेले काही फोटो पाहायला मिळतात.
व्हिडीओमध्ये पुढे त्याने त्यानंतर त्याने जे फोटो शेअर केले आहेत, त्यामध्ये तो फिट दिसत आहे. त्याने वजन कमी केल्याचे दिसत आहे. त्याचे जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ शेअर करताना “स्वतःमध्ये बदल घडवून आणणं हीच यशाची गुरुकिल्ली आहे”, अशी कॅप्शन लिहिली आहे.
हरीश दुधाडेच्या या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट्स करत त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. यामध्ये अनेक कलाकारांचाही समावेश आहे. क्षिती जोगने इमोजी शेअर करत कौतुक केले आहे, तर अंकित मोहनने ट्रान्सफॉर्मेशन इज द की अँड यू हॅव मास्टर की बहिर्जी (Transformation is the key and you have Master Key) असे लिहिले आहे. तसेच मला तुझा अभिमान वाटतो, असेही लिहिले आहे. याबरोबरच नेटकऱ्यांनीही कमेंट्स करत त्याचे कौतुक केले आहे.

एकाने लिहिले, “जुने दिवस आठवले, तुमची पहिली मालिका आठवली”; दुसऱ्या एकाने लिहिले, “तुम्हाला परत बहिर्जी नाईक यांच्या भूमिकेत पहायची इच्छा आहे “, आणखी एकाने लिहिले, “इन्स्पेक्टर विजय भोसलेची मालिका परत आली तर मजा येईल” अशा अनेक कमेंट्स करत नेटकऱ्यांनी त्याचे कौतुक केले आहे.
दरम्यान, हरीश त्याच्या या ट्रान्सफॉर्मेशनबद्दल काही खुलासा करणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
