scorecardresearch

“त्याने कालच मॅसेज केला आणि…” ‘तारक मेहता…’ फेम मराठमोळ्या अभिनेत्याच्या निधनानंतर हेमांगी कवी भावूक

मराठमोळा अभिनेता सुनील होळकर यांचं निधन, अभिनेत्री हेमांगी कवीने केलेली पोस्ट चर्चेत

“त्याने कालच मॅसेज केला आणि…” ‘तारक मेहता…’ फेम मराठमोळ्या अभिनेत्याच्या निधनानंतर हेमांगी कवी भावूक
मराठमोळा अभिनेता सुनील होळकर यांचं निधन, अभिनेत्री हेमांगी कवीने केलेली पोस्ट चर्चेत

मराठमोळा अभिनेता सुनील होळकर यांचं शुक्रवारी (१३ जानेवारी) निधन झालं. ते ४० वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी आणि दोन मुलं असा परिवार आहे. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’सह अनेक हिंदी आणि मराठी टीव्ही मालिकांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. सुनील यांच्या निधनानंतर कलाविश्वाला दुःखद धक्का बसला आहे. गोल्या काही दिवसांपासून यकृताशी संबंधित आजाराशी ते सामना करत होते. मात्र उपचारादरम्यानच त्यांची प्राणज्योत मालवली.

टीव्ही ९ हिंदीने दिलेल्या वृत्तानुसार, सुनील गेल्या काही दिवसांपासून लिव्हर सोरायसिसने त्रस्त होते. त्यांच्यावर उपचारही सुरू होते, मात्र शुक्रवारी १३ जानेवारी रोजी त्यांचं निधन झालं. सुनील यांनी अखेरचं ‘गोष्ट एका पैठणीची’ या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपटात काम केलं होतं. सुनील यांच्या निधनानंतर अभिनेत्री हेमांगी कवी भावूक झाली आहे.

आणखी वाचा – ‘तारक मेहता…’ फेम मराठमोळ्या अभिनेत्याचं निधन, ४०व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

हेमांगी कवीची भावूक पोस्ट

हेमांगी कवी पोस्ट शेअर करत म्हणाली, “काही दिवसांपूर्वी पराग बेडेकर गेला. आता सुनील होळकर. आपल्या ओळखीची, सतत हसतमुख, जिंदादील माणसं जेव्हा अशी अचानक निघून जातात तेव्हा खरंच काही वेळ काय करावं, काय बोलावं सुचत नाही.”

“डोक्यात आधी चाललेल्या विचारांची चक्र अचानक थांबतात. सुन्न. जे कळलंय ते खरं आहे का? असं कसं शक्य आहे? अरे कालच तर त्याने मॅसेज केला होता. हे सगळं व्हायला वेळ लागतो आणि प्रोसेस जरी झालं तरी पराग आणि सुनील मित्रांनो हे बरोबर नाही.” सुनील यांनी अशोक हांडे यांच्या चौरंग नाट्य संस्थेत अनेक वर्षे काम केलं होतं. अभिनेता आणि कथाकार अशी त्यांची ओळख होती. त्यांनी १२ वर्षांहून अधिक काळ रंगभूमीच्या माध्यमातून काम केलं.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन ( Television ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 14-01-2023 at 18:46 IST

संबंधित बातम्या