बिग बॉस ओटीटीचं दुसरं पर्व संपल्यापासून सर्व प्रेक्षकांचं ‘बिग बॉस सीझन १७’कडे लक्ष लागून राहीलं होतं. छोट्या पडद्यावरील वादग्रस्त रिअ‍ॅलिटी शो ‘बिग बॉस सीझन १७’ची प्रेक्षक वर्ग आतुरतेने वाट पाहत आहेत. अखेर ‘बिग बॉस सीझन १७’ सुरू होण्याचा मुहूर्त ठरला आहे. काल ‘कलर्स टीव्ही’नं यासंबंधित तीन नवे प्रोमो जारी करून यंदाच सीझन कधीपासून सुरू होणार याची घोषणा केली आहे.

हेही वाचा – अपघातामुळे वजन गेलं शंभरीपार.. अलका कुबल यांनी कशी केली त्यावर मात? वाढदिवसानिमित्त जाणून घ्या त्यांच्या आजवरच्या प्रवासाबद्दल

shilpa shirodkar on namrata shirodka mahesh babu
Bigg Boss 18 : शिल्पा शिरोडकरने बहीण नम्रता व तिचा पती महेश बाबूकडून पाठिंबा न मिळण्याबद्दल सोडलं मौन; म्हणाली, “मला…”
Pushpak train accident of karnataka express play horn may save life of many passengers
Jalgaon Train Accident : कर्नाटक एक्स्प्रेसच्या चालकाने भोंगा वाजवला…
Dhoom 4
रणबीर कपूरच्या ‘धूम ४’मध्ये खलनायक कोण असणार? दाक्षिणात्य अभिनेत्याची वर्णी लागण्याची शक्यता
Bigg Boss 18 Shilpa Shirodkar Husband Sent Letter watch promo
Bigg Boss 18: “मी नीट झोपतंही नाहीये, जेवणाची चव गेलीये…”, शिल्पा शिरोडकरने ढसाढसा रडत वाचलं नवऱ्याचं पत्र, पाहा व्हिडीओ
Bigg Boss 18 Shilpa Shirodkar Evicted From Salman Khan Show
Bigg Boss 18: महाअंतिम सोहळ्याच्या चार दिवसाआधी झालं मिड वीक एविक्शन, ‘ही’ मराठमोळी सदस्य झाली घराबाहेर
Huppa Huiyya 2 announcement
ठरलं! १५ वर्षांनी येणार मराठी चित्रपट ‘हुप्पा हुय्या’चा सिक्वेल, दिग्दर्शकाने केली घोषणा
Bigg Boss Marathi Fame Yogita Chavan Dance Video
‘झुमका गिरा रे…’, ५९ वर्षांपूर्वीच्या लोकप्रिय गाण्यावर Bigg Boss फेम योगिता चव्हाणचा जबरदस्त डान्स! पतीची खास कमेंट
punjab kings new captain announced in 18 big boss
‘पंजाब किंग्ज’च्या नव्या कर्णधाराचे नाव ‘बिग बॉस १८’ मध्ये झाले जाहीर; ‘या’ स्टार खेळाडूकडे सोपवली धुरा

‘कलर्स टीव्ही’नं प्रदर्शित केलेल्या ‘बिग बॉस सीझन १७’च्या तिन्ही नव्या प्रोमोमध्ये होस्ट सलमान खान वेगवेगळ्या रुपात पाहायला मिळत आहेत. एका प्रोमोमध्ये बॉम्बशोधकाच्या रुपात, तर दुसऱ्या प्रोमो गुप्तहेराच्या रुपात दिसत आहे. तसेच तिसऱ्या प्रोमोमध्ये तो कव्वाली गायकाच्या रुपात पाहायला मिळत आहे. अशा तीन दमदार प्रोमोद्वारे सलमान खानने ‘बिग बॉस सीझन १७’ची कधीपासून सुरू होणार याची तारीख जाहीर केली आहे.

हेही वाचा – “आम्हाला वाचवण्याच्या ऐवजी बाउंसर…” गौतमी पाटीलनं सांगितला ‘तो’ प्रसंग, म्हणाली, “ती भीतीदायक परिस्थिती…”

बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित असा ‘बिग बॉस सीझन १७’ १५ ऑक्टोबरपासून सोमवार ते शुक्रवार रात्री १० वाजता प्रसारित होणार आहे. तर शनिवारी आणि रविवारी ९ वाजता प्रसारित होणार आहे. तसेच ओटीटी प्लॅटफॉर्म ‘जिओ सिनेमा’वर २४ तास लाइव्ह देखील पाहायला मिळणार आहे.

हेही वाचा – दाक्षिणात्य लोकप्रिय अभिनेत्री साई पल्लवीने लग्नाच्या अफवांवर सोडलं मौन; नाराजी व्यक्त करत म्हणाली…

हेही वाचा – “तू लग्न कधी करणार?” अखेर गौतमी पाटीलने दिलं उत्तर, नवऱ्याबद्दलच्या अपेक्षा सांगताना म्हणाली…

दरम्यान, अजूनपर्यंत ‘बिग बॉस सीझन १७’मध्ये कोण-कोण स्पर्धक असणार हे जाहीर झालेलं नाही. पण सध्या काही नावांबाबत जोरदार चर्चा सुरू आहे. अभिनेत्री अंकिता लोखंडे, ईशा मालवीय, अर्जित तनेजा, ऐश्वर्या शर्मा आणि अरमान मलिका यांसारखे अनेक स्टार्स ‘बिग बॉस सीझन १७’मध्ये पाहायला मिळणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Story img Loader