बिग बॉस ओटीटीचं दुसरं पर्व संपल्यापासून सर्व प्रेक्षकांचं ‘बिग बॉस सीझन १७’कडे लक्ष लागून राहीलं होतं. छोट्या पडद्यावरील वादग्रस्त रिअॅलिटी शो ‘बिग बॉस सीझन १७’ची प्रेक्षक वर्ग आतुरतेने वाट पाहत आहेत. अखेर ‘बिग बॉस सीझन १७’ सुरू होण्याचा मुहूर्त ठरला आहे. काल ‘कलर्स टीव्ही’नं यासंबंधित तीन नवे प्रोमो जारी करून यंदाच सीझन कधीपासून सुरू होणार याची घोषणा केली आहे.
‘कलर्स टीव्ही’नं प्रदर्शित केलेल्या ‘बिग बॉस सीझन १७’च्या तिन्ही नव्या प्रोमोमध्ये होस्ट सलमान खान
हेही वाचा – “आम्हाला वाचवण्याच्या ऐवजी बाउंसर…” गौतमी पाटीलनं सांगितला ‘तो’ प्रसंग, म्हणाली, “ती भीतीदायक परिस्थिती…”
बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित असा ‘बिग बॉस सीझन १७’ १५ ऑक्टोबरपासून सोमवार ते शुक्रवार रात्री १० वाजता प्रसारित होणार आहे. तर शनिवारी आणि रविवारी ९ वाजता प्रसारित होणार आहे. तसेच ओटीटी प्लॅटफॉर्म ‘जिओ सिनेमा’वर २४ तास लाइव्ह देखील पाहायला मिळणार आहे.
हेही वाचा – दाक्षिणात्य लोकप्रिय अभिनेत्री साई पल्लवीने लग्नाच्या अफवांवर सोडलं मौन; नाराजी व्यक्त करत म्हणाली…
हेही वाचा – “तू लग्न कधी करणार?” अखेर गौतमी पाटीलने दिलं उत्तर, नवऱ्याबद्दलच्या अपेक्षा सांगताना म्हणाली…
दरम्यान, अजूनपर्यंत ‘बिग बॉस सीझन १७’मध्ये कोण-कोण स्पर्धक असणार हे जाहीर झालेलं नाही. पण सध्या काही नावांबाबत जोरदार चर्चा सुरू आहे. अभिनेत्री अंकिता लोखंडे, ईशा मालवीय, अर्जित तनेजा, ऐश्वर्या शर्मा आणि अरमान मलिका यांसारखे अनेक स्टार्स ‘बिग बॉस सीझन १७’मध्ये पाहायला मिळणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Highly awaited bigg boss season 17 premiere date and other details are finally revealed pps