देशभरात गणेशोत्सव साजरा केला जात आहे. मुंबईत या सणाचा विशेष उत्साह पाहायला मिळत आहे. गणरायाचे दर्शन घेण्यासाठी आणि आशीर्वाद घेण्यासाठी सर्वसामान्यांसह अनेक सेलिब्रिटी गणेश पंडालला भेट देत आहेत. अगदी लालबागचा राजापासून ते इतर सेलिब्रिटींच्या घरीही कलाकार बाप्पाच्या दर्शनासाठी जात आहे. टीव्ही अभिनेत्री हिना खानही ‘अंधेरीचा राजा’च्या दर्शनाला गेली.
करीना कपूर किती शिकली आहे माहितीये का? वाचा तिची शैक्षणिक पार्श्वभूमी
पारंपारिक लूकमध्ये हिना खान बाप्पाच्या दर्शनाला पोहोचली. पांढऱ्या रंगाच्या साडीत हिना खूपच सुंदर दिसत होती. हिना बाप्पाच्या पाया पडली आणि आशीर्वाद घेतले. तिचा या भेटीदरम्यानचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ‘विरल भयानी’ने शेअर केलेल्या या व्हिडीओवर नेटकरी विविध प्रकारच्या कमेंट्स करत आहेत. काहींनी उमराह करून आलेली हिना गणरायाच्या दर्शनाला पोहोचल्याने तिच्यावर टीका केली आहे. काहींनी मात्र तिचं कौतुक केलं आहे.
काही युजर्सनी तिच्यावर टीका केली आहे. ‘काही दिवसांपूर्वीच उमराह करून आलीस ना तू’, असं काहींनी म्हटलं आहे. ‘तू तुझा धर्म का बदलून घेत नाहीस, हा काय रोजचा ड्रामा आहे तुझा’, ‘उमराह केल्यानंतर तू असं करायला नको होतं,’ अशा प्रकारच्या कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत.
काहींनी मात्र तिचं कौतुक केलं आहे. ‘जो प्रत्येक धर्माला समान मानतो, तोच खरा मुस्लीम आहे. धर्मावरून एकमेकांना बोलल्याने भांडणाशिवाय फारसं काहीही साध्य होतं नाही. आतापर्यंत तरी काहीच साध्य झालेलं नाही, भविष्यात कोणास ठाऊक?’ अशी कमेंट एका युजरने केली आहे.
अनेकांना हिनाचा हा लूक खूप आवडला. त्यामुळे त्यांनी हिनाच्या लूकही खूप कौतुक केलं आहे. तसेच ती न चुकता दरवर्षी गणरायाचे दर्शन घेण्यास पोहोचते, असंही म्हटलं आहे.