मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री हृता दुर्गुळे सध्या चर्चेत आहे. आज (१८ मे रोजी) तिच्या लग्नाला दोन वर्ष पूर्ण झाली. लग्नाच्या वाढदिवसानिमित्ताने हृताने तिच्या पतीसाठी सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली आहे.

हृताने पती प्रतीक शाहबरोबर रोमॅंटिक फोटो शेअर केले आहेत. या फोटोला कॅप्शन देत तिने लिहिलं, “लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा मिस्टर शाह. तू जसा आहेस तसाच राहिल्याबद्दल तुझे खूप आभार.”

प्रतीक शाहनेदेखील हृताला शुभेच्छा देण्यासाठी एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ते खूप ठिकाणी फिरताना दिसतायत. मजा लूटताना दिसतायत. एकमेकांबरोबर क्वालिटी टाईम शेअर करताना दिसतायत. या व्हिडीओला कॅप्शन देत प्रतीकने लिहिलं, “वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. एकत्र, आनंदी आणि मजा करत घालवलेली ही दोन वर्ष आपण आज साजरी करतोय. तू जशी आहेस तशीच राहिल्याबद्दल तुझे खूप आभार.”

प्रतीकने चाहत्यांना नमूद करत पुढे लिहिलं, “मला असं वाटतं की, या ऑडिओ व्हिडीओद्वारे आम्ही गेली दोन वर्षे कशी घालवली आहेत ते दिसतं आणि आमची पुढची सर्व वर्षे अशीच जावोत अशी मी प्रार्थना करतो, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे.”

हेही वाचा… “आई तू कुठे आहेस”, राखी सावंतवर होणार शस्त्रक्रिया; अभिनेत्रीला कठीण काळात येतेय आईची आठवण, व्हिडीओ शेअर करत म्हणाली…

हृता दुर्गुळे आणि प्रतीक शाहच्या लव्हस्टोरीबद्दल सांगायचं झालं तर प्रतीकची आई मुग्धा शाह यांच्यामुळे दोघांची ओळख झाली. मुग्धा यांनी हृताबरोबर दुर्वा या मालिकेत काम केलं होतं. या मालिकेत हृताच्या आईची भूमिका मुग्धा यांनी साकारली होती. या मालिकेमुळे त्यांचं नातं खूप छान झालं. मुग्धा यांच्या घरी हृताचं येणं जाणंसुद्धा व्हायचं. त्यामुळे हृता आणि प्रतीकची ओळख झाली. नंतर त्यांची मैत्री झाली आणि मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं.

हेही वाचा… “तुमच्या भारत मातेला त्रास देऊ नका”, लोकसभा निवडणुकीदरम्यान सलमान खानने शेअर केली खास पोस्ट, म्हणाला…

दोघांनी एकमेकांना डेट करायला सुरुवात केली. तेव्हा हृताचं मुग्धा यांच्या घरी येणं-जाणं वाढलं तेव्हाच मुग्धा यांना संशय आला होता, परंतु तेव्हा त्या काहीच बोलल्या नाहीत. कालांतराने हृता आणि प्रतीकने एकमेकांशी लग्न करण्याचा निर्णय घेतला, त्यावेळी मुग्धा यांना सांगायचं कसं याचं टेन्शन दोघांना आलं होतं. मुग्धा थोड्या स्ट्रिक्ट असल्याने हृताला त्यांना सांगायला भीती वाटत होती, तर प्रतीकदेखील अस्वस्थ होता; परंतु प्रतीकने हिंमत गोळा करत आईला सांगितलं. तेव्हा मु्ग्धा यांनी त्यांच्या लग्नाला होकार दिला.

२४ डिसेंबर २०२१ ला हृता आणि प्रतीकचा साखरपुडा झाला. नंतर १८ मे २०२२ रोजी हृताने आणि प्रतीकने लग्नगाठ बांधली. या दोघांनी अत्यंत थाटामाटात लग्न केले. त्यांच्या लग्नाला अनेक मराठी आणि हिंदी कलाकारांनी हजेरी लावली होती.