ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी२० विश्वचषकात गुरुवारी ‌(१० नोव्हेंबर) भारत आणि इंग्लंड यांच्या दरम्यान दुसरा उपांत्य फेरीचा सामना खेळला गेला. भारतीय संघाने सांघिक कामगिरीच्या जोरावर उभारलेल्या १६८ धावांचा पाठलाग करताना इंग्लंडने आपल्या दोन्ही सलामीवीरांच्या शानदार खेळीच्या जोरावर भारताचा तब्बल १० गडी राखून दारुण पराभव करत अंतिम फेरीत जागा निश्चित केली. यानंतर मराठी अभिनेता निखिल राऊतची फेसबुक पोस्ट चर्चेत आली आहे.

टी २० विश्वचषकात भारताचा दारुण पराभव झाल्यानंतर अभिनेता निखिल राऊतने त्याच्या अधिकृत फेसबुक हॅन्डलवरून एक पोस्ट शेअर केली आहे. निखिलने या त्याच्या पोस्टमध्ये भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीचा फोटो शेअर केला. आता इंग्लंड आणि पाकिस्तानच्या अंतिम सामन्याआधी निखिल राऊतची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. आपल्या पोस्टमधून निखिलने भारतीय संघाला अप्रत्यक्षपणे टोलाच लगावल्याचं दिसत आहे.

IPL 2024 Mumbai Indians vs Chennai Super Kings Match Updates in Marathi
IPL 2024: धोनीच्या वादळी खेळीने आनंद महिंद्राही झाले चकित, माहीचे कौतुक करताना म्हणाले, “कृतज्ञ आहे की माझं नाव Mahi-ndra…”
Despite the efforts of PR Sreejesh the Indian hockey team lost
श्रीजेशच्या प्रयत्नांनंतरही भारतीय हॉकी संघाचा पराभव
candidates tournament 2024 marathi news, candidates tournament 2024 chess marathi news
विदित, प्रज्ञानंद, गुकेश… यांच्यातील कोणी विश्वनाथन आनंद बनेल?
IPL 2024 Gujarat Titans vs Mumbai Indians Match Updates in Marathi
IPL 2024 GT vs MI: …आणि रोहित शर्मा पंड्याला म्हणाला, “कोण? मी?”, हार्दिकच्या ‘या’ कृतीवर चाहत्यांचा संताप; पाहा नेमकं काय घडलं मैदानात!

आणखी वाचा- “भारताची टुकार खेळी आणि…” मराठी अभिनेत्याच्या ट्वीटने वेधलं लक्ष

निखिल राऊतने त्याच्या फेसबुकवर कॅप्टन कूल धोनीचा फोटो शेअर करताना त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिलं, “एकावर समाधान” आपल्या या पोस्टमध्ये त्याने #inauguraledition #2007T20WorldCup #MSDhoni #indiancricket MS Dhoni असे हॅशटॅगही वापरले आहेत. भारताच्या पराभवानंतर निखिलची ही पोस्ट चर्चेत आली असून चाहते त्यावर कमेंट करताना दिसत आहे. ‘धोनीसारखा दुसरा कोणीच होऊ शकत नाही’ अशा आशयाच्या कमेंट्स युजर्सनी केल्या आहेत.

दरम्यान भारतीय संघाने २००७ मध्ये कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली टी २० विश्वचषक जिंकला होता. त्यानंतर आतापर्यंत उपांत्य किंवा अंतिम फेरीपर्यंत जाऊनही भारताला पुन्हा विश्वचषक जिंकता आलेला नाही. यंदा विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत इंग्लंडने १० गडी राखून टीम इंडियाचा पराभव केला. भारतीय संघ टी२० विश्वचषकातून बाहेर पडला. अंतिम सामना हा पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात १३ नोव्हेंबरला मेलबर्न येथे रंगणार आहे.